एक गम्मत सांगतो! :)
कॉमनवेल्थ गेम्स, दिल्ली चे केंद्राचे बजेट होते २००० कोटी.
एकूण खर्च झाला १५००० कोटी.
म्हणजे दिल्ली सरकारने वरचे १३००० कोटी खर्च केले.
सुरेश कलमाडीवर या वर्षी मे महिन्यात जी चार्जशीट दाखल केली, त्यामध्ये स्विस कंपनी बरोबर टायमिंग, स्कोअरिंग आणि रिझल्ट (टीएसआर) मध्ये १४१ कोटीनी किमत वाढवली असा आरोप लावला. उपकरणे इत्यादी इत्यादी मध्येही त्याने घोटाळा केला. (हे चार्जशीट मध्ये लिहिले नसले तरी वृत्तपत्रसूत्रानुसार) आपण अजून १६० कोटी त्या साठी देवू.
म्हणजे कलमाडी चा घपला ३०० कोटी.
म्हणजे १००० कोटीची जबाबदारी कोणाची ?. . . राज्य सरकारची . . म्हणजे कोणाची? . . . .
शीला दीक्षित!!
कलमाडी ३०० कोटी साठी तिहार मध्ये स्मृती भ्रंश करून बसला. आणि १००० कोटीना जबाबदार असण्यार्या शीलांचे कुठेच नाव नाही.
आहे कि नाही गम्मत?
No comments:
Post a Comment