Monday, September 19, 2011

खळे काका तुम्ही सदैव आमच्या स्मरणात असाल !!! We will miss you Khale Kaka!!!

मराठीतील एक उमदा संगीतकार काळाच्या पडद्याआड गेला!!! मराठी संगीत दुनियेत एक अत्यंत मानानी घेतले जाणारे नाव म्हणजे श्रीनिवास खळे, ज्यांना प्रेमानी खळे काका असे म्हणत!!! भारत सरकारने पद्म भूषण पुरस्कार देवून त्यांची आणि आम्हा मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावली!!! सहा दशकाहून जास्त ज्यांनी आपल्याला संगीताची एक सुश्राव्य सफर घडविली अशा खळे काकांना एक विनम्र श्रद्धांजली!!!! एक मानाचा मुजरा !!!

खळे काकांनी संगीतबद्ध केलेल्या काही गीतपंक्ती !!!



अगा करुणाकरा करितसें धांवा ।
या मज सोडवा लवकरी ॥१॥

ऐकोनियां माझी करुणेचीं वचनें ।
व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥

मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव ।
ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥

उशीर तो आतां न पाहिजे केला ।
अहो जी विठ्ठला मायबापा ॥४॥

उरलें तें एक हें चि मज आतां ।
अवघें विचारितां शून्य जालें ॥५॥

तुका म्हणे आतां करीं कृपा दान ।
पाऊलें समान दावीं डोळां ॥६॥

रचना - संत तुकाराम
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - लता मंगेशकर
राग - तोडी





एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू त्यात एक

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड नं विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास तोची दावी उगीच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भयं वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - आशा भोसले
राग - भीमपलास

No comments:

Post a Comment