Tuesday, December 29, 2009

एक 'व. पु.' कथा. A Language in Evolution From Satara

मराठी - A Language in Evolution ... एक 'व. पु.' कथा.

अलीकडेच सातार्ला ( साताऱ्याला ) जाण्याचा योग आला .
इथेही मोबाईल ( इकडे शेल्फोन म्हणतात ) धारकांची वाढती संख्या
सहज नजरेत भरण्यासारखी होती . ज्याला पाहावे त्याच्या मोबाईल
हाताला आणि हात कानाला . इथल्या शेल्फोनधारकांच्या संभाषणात
‘ बर्मगठिव्का ’ आणि ‘ बर्मगठिव्तो ’ हे दोन शब्द पुन: पुन्हा उच्चारले
जात होते . ऐकून ऐकून कान आणि मेंदूचं पार भेंडाळं व्हायला आलं ,
मात्र ‘ बर्मगठिव्का ’ ही काय भानगड आहे याचा मला काहीच उलगडा
होत नव्हता . कुतुहलापोटी मी प्रत्येक शेल्फोनधारकाचे संभाषण अगदी
जीवाचे कान करून ऐकू लागलो .

यातून एक गोष्ट मात्र फायद्याची ठरली ती म्हणजे मोबाईल फोनच्या
संबंधित बऱ्याच इंग्रजी शब्दांच्या देशीकरणाच मला चांगलाच उलगडा झाला.
खालच्या बाजारातून वरच्या बाजारापर्यंत फेरफटका मारताना ‘ बर्मगठिव्का ’
चा उलगडा होईपर्यंत जी जी संभाषणे मी ऐकली त्यातले काही तुकडे जरी
आपण ऐकले तरी आपल्या शब्दसंचामध्ये नवीन शब्दांची नक्कीच भर पडेल.

********* * * * * * *********
तर ऐकूया संभाषण नं . १

क : आर्कवा धर्न ट्राय कर्तोय तुजा आप्ला सार्खा आव्टाफकव्रेचज दाव्तोय.
कंचा हाय तुजा ?
ख : माजा यार्टेल ( एअरटेल ). तुझा ?
क : माजा ब्येस्नेल ( बी . एस . एन . एल .)
( कव्हरेज या शब्दाला इकडे असंख्य पर्याय आहेत . कौरेच , कौरेज ,
कव्रेज , करवेज आणि कर्वेजसुद्धा .)
ख : आर्आता आमच्याकड आयडय़ान् वडाफोनचंबी टावरं झाल्याती .
आन् रिंज ( रेंज ) बी बरी घाव्ते .
क : आता हा कंचा म्हंन्लास वडा क् काय त्ये .
ख : हौ ऽऽ वडा वडाच . आर्पय्ला आरिंज म्हंजी संत्र न्हव्तं का,
मगं हुच (HUTCH) झालं . आनात्ता वडाफोन .

आणखी बरंच काही संभाषण होत असतं . त्यात अधूनमधून ‘ बर्मगठिव्का ’
व ‘ बर्मगठिव्तो ’ ही चालूच असतं .

********* * * * * * *********
संभाषण क्र . २ .

ग : आर्तुहाय्स कुठं , पंध्रा दिस झालं सार्खा ट्राय कर्तुय सरख आप्लं वेट्व
( वेटिंगवर ) ची टॅप वाज्तीय . बर्तुजा म्हात्रा आजा कसाय ? (‘ कसाय ’
चा अर्थ ‘ कसा आहे ’ असा घेणे ).
घ : आर्आजाला गाच्कुन पंध्रा दिस झालं की .
ग : हात्तिच्यामाय्ला ! र्आमग येकाद् यश्मेस ( एस . एम . एस .) त
करायचा का न्हाय .
आणखी बरंच काही आणि अधूनमधून ‘ बर्मगठिव्का ’.

********* * * * * * *********
संभाषण क्र . ३

ट : आर्तुजी क्वालर्टुन ( कॉलरटय़ुन ) बादाल्ली वाट्टं .
ठ : व्हय . जाला की म्हैना , आन् रिंग्टुन ( रिंग टोन ) बी बदली केलीया .
कराची का तुला डांलोड ( डाऊनलोड )?
ट : करू की मंग कवातरी . तुज्यात कोंचं शिम्काड ( सिमकार्ड ) हाय म्हंलास .
ठ : माज्यात बीप्येल ( बी . पी . एल .)
ट : टॉक्टाय्माचंय ( टॉक टाईम ) का बिलाचंय ?
ठ : त्ये काय ठावं न्हाय गडय़ा . तातु म्हन्ला व्हता पिर्पेट ( प्रीपेड ) क् काय हाय .
पन रिंज न्हाय गडय़ा .
ट : आमच्याकड् रिलांसनटाटाची बरी घाव्ते ( रेंज ). घरात वाईच नेटवरचा
( नेटवर्कचा ) प्राब्लेम अस्तो . बाकी बाज्रारात झ्ॉक .
आणखी बरंच काही बोलणं होत असताना मध्ये मध्ये ‘ बर्मगठिव्का ’
‘ बर्मगठिव्तो ’ होतच असतं .

********* * * * * * *********
संभाषण क्र . ४

ड : तुजा हँशेट ( हँडसेट ) कोंचा हाय रं ?
ढ : माजा नोक्या ( नोकिया ). लाँग्लाय्फची ( लाँग लाईफ ) बॅट्री नोक्याचीच गडय़ा .
बाकी मोट्रोला , सामसुम , येरिक्शन , येल्ची बिल्चीचं काय बी खरं न्हाय बग .
तुजा कोंचा हाय ?
ड : माजाबी नोक्याच हाय . यफ यम , रेडोन्क्यॅम्रा ( रेडिओ अन् कॅमेरा ) बी हाय .
ढ : माज्यात बी हाय रं . माज्यात विडो ( व्हिडीओ ) बी हाय आन् चार जीभीची
( जी . बी .) मेम्री पन् हाय .

आणखी बरंच काही बोलणं होत असतं आणि मध्ये मध्ये बर्मगठिव्का .
या सगळ्यांबरोबरच मध्ये मध्ये ‘ आर्पन ’ ( अरे पण ), ‘ हात्तिच्यामाय्ला ’,
‘च्या माय्ला’ आणि ‘ चॅआय्ला ’ अशा ठराविक शब्दांचा योग्य आणि अयोग्य
ठिकाणी भरपूर वापर होत असतो . बाकी सर्व कठिण शब्दांचे अर्थ मी लावू
शकत होतो परंतु हे ‘ बर्मगठिव्का ’ माझी पाठ सोडत नव्हतं . शेवटी न राहवून
एकाचं तोंड आणि फोन बंद झाला तेव्हा त्याला मुद्दामच विचारलं .

मी : हे ‘ बर्मगठिव्का ’ म्हंजे काय राव ?
नाना पाटेकरच्या स्टाईलमध्ये तो म्हणाला , ‘ भायर्न आलाय दिस्तासा .’
मी : हो , मुंबईहून .
मग विक्रम गोखलेच्या स्टाईलमध्ये ( विथ अ ‍ ॅक्शन ) त्याने मला समजावलं .
‘ बर्मगठिव्का ’ म्हंजी , बर ऽऽ मंऽग ऽऽ ठिवू ऽऽ क्का .
म्हंजी फून ( फोन ) ठिवू ऽऽ क्काऽ ’

( हात्तिच्या मा .. माझ्या तोंडात आलंच होतं . मात्र ओठाबाहेर फुटू दिलं नाही .)

‘ बर्मगठिव्का च्या ’ गुंत्यातून एकदाचा मोकळा झालो . डोकं हलकं हलकं झालं .
इतका साधा सरळ शब्द मला कळला कसा नाही . विचार करतच होतो इतक्यात
माझा शेल्फोन वाजला . मी हॅलो बोलायच्या आतच पलीकडून जोरात आवाज आला .

‘ आर्हाय्स्कुठं तू ? कवा धर्न ट्राय कर्तुया तुझा सार्खा आप्ला सीचहॉप ( स्वीच ऑफ ),
वेट्व नाय्त आप्लं बीजी .’
मी : कोण बोलताय ?
पलिकडून : आर्मीसर्जा ( अरे मी सर्जा ).

या सातार्करांची सर्व शब्द जोडून एक वाक्य एका शब्दात बोलण्याची कला मात्र
फक्कड हाय बगा . मी कोणा सर्जाला ओळखत नव्हतो . त्याच्याकडून चुकून
माझा नंबर लागला गेला असावा . तरीसुद्धा थोडी मजा करावी म्हणून जोरात ओरडून -

मी : आर्पन हिथ्लं नेटवर पार ढय़ापाळंय बग . माजा आव्टाफकौरेचज झालाय .
बाज्रात पोचल्याव मंग मीच लावतो तुला , र्बमगठिव्का ?

सर्जा : आर्पन .. मला .. आर्र ..

त्याचं बोलणं तोडत मी ‘ बर्मगठिव्तो ’ बोलून ( जवळ जवळ ओरडूनच )
माझा शेल्फोन सिचहॉप केला .


जाय सत्तार्रा
जाय मराष्ट

------------------व. पु.



No comments:

Post a Comment