Showing posts with label टिवल्या बावल्या. Show all posts
Showing posts with label टिवल्या बावल्या. Show all posts

Monday, April 30, 2012

Priy Amucha ek maharashtra Desh ha - Maharashtra Geet

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे,
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा

- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

Priy Amucha ek maharashtra Desh ha - Maharashtra Geet

जयोऽस्तु ते

जयोऽस्तु ते जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!
श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!

राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची
स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तूं त्यांची
परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी
स्वतन्त्रते भगवती चांदणी चमचम-लखलखशी

गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतन्त्रते भगवती तूंच जी विलसतसे लाली
तुं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहिं तूंचि
स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची
मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांतीं
स्वतन्त्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती
जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहकारी होती

हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते
तुजसाठि मरण तें जनन
तुजवीण जनन तें मरण
तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण

-विनायक दामोदर सावरकर

Jayostute lyrics in marathi

हे राष्ट्र देवतांचे

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
-गीतकार
- ग. दि. माडगुळकर
गायक
- राणी वर्मा
संगीतकार
- सी. रामचंद्र
चित्रपट
- घरकुल - 1970

Saturday, April 28, 2012

सुविचार दिग्गजांचे

जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.

- नारायण मूर्ती

यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.

-- विश्‍वनाथन आनंद

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्‍य आहे.** *

-- धीरूभाई अंबानी

पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. *

-- जे. आर. डी. टाटा

फोटोग्राफरच्या एका "क्‍लिक'मुळे जगणे चिरकाल होते.** *

-- रघू राय

चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.*

- बिल गेट्‌स

मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. *

- कल्पना चावला

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.*

-- बराक ओबामा

माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.

-- आयझॅक न्यूटन

मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे.

-- सर्वपल्ली राधाकृष्णन*

Sunday, March 4, 2012

एक कविता नौकरी करणाऱ्याची

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

जुगलबंदी चालू होती दोघांची..
आता वेळ कमी तेव्हा पैसे कमी..
... आनंदी आता आहे का तेव्हा होतो ?
आठवता आठवता दुखी होतो....

तेव्हा रोड साइड जीन्स वापरायचो...मित्रांच्या
आता CK, Diesel धूळ खात पडल्या आहेत माझ्या...

तेव्हा सामोसा दिसला की भूक शमायची....
आता पिझ्झा बर्गरने सुद्धा ती नाही लागायची..

तेव्हा पैसे जमवून पेट्रोल भरायचो..
लांब लांब फिरायला जायचो...
आता tank फुल्ल असूनही...
मित्रांना मुकलो....

टपरी वरचा चहा CCD मधल्या cofee मधे बदलला,
पण हा फरक मनाला नाही पटला..
Pre-Paid Card वरुन बोलायची तेव्हा मजा यायची...
आता postpaid असूनही बोलायला नाही कुणी..

दिवस बदलले ... General class मधून Business Class झाला.
पण फिरायला आता वेळ नाही उरला...

तेव्हा Second hand का होईना Desktop असावा असे .वाटत..
आजकाल Branded Laptop असूनही चालू करावा नाही वाटत...

खरी मैत्री Proffesional frenz मधे बदलली
पण त्या...मैत्रीची सर नाही आली....

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
-- Facebook

Sunday, December 18, 2011

Parcel Culture पार्सल संस्कृती

आपण जेवत असतानाच कुणी पाहुणा आला की, हातात ताट घेऊन आत पळत जायची पद्धत तेव्हा आली नव्हती. जे आपल्या पानात, ती चटणी-भाकरी चटकन वाढली जायची आणि भूक असो वा नसो, दोन घास मायेचे स्वीकारून अतिथी तृप्त व्हायचा. आता मनात असूनही बदलत्या जीवनशैलीनं आपले आग्रहही समजूतदार झाले; पण आता समजून घ्यायचं म्हणजे नेमकं किती समजून घ्यायचं, हेच समजण्याची पंचाईत झालेय. अशीच पंचाईत माझी अलीकडं झाली.

अनेक दिवसांचा आग्रह आता दूर लोटणं अवघड झाल्यानं शेवटी श्रीकांत अन्‌ मृदुलाला मी कळवलंच ः "येतो येत्या शनिवारी जेवायला.'
त्यांना झालेला आनंद मला फोनवरही जाणवत होता. केवळ आपण एखाद्याकडं "जेवायला येतोय' म्हटल्यावर समोरच्या माणसाला एवढा आनंद होतो, ही गोष्टच केवढी सुखद आहे.

तासभर आधीच गेलो. थोड्या गप्पा होतील; मग सावकाशीनं जेवण. खरं तर जेवण हे केवळ गप्पांसाठीचं निमित्त. एकमेकांचा मैत्रभाव साधणारा एक रुचकर दुवा! पाच-दहा मिनिटं गप्पा झाल्यावर उत्साहानं श्रीकांत म्हणाला, "तुम्हीच सांगा, कुठलं हॉटेल "प्रीफर' कराल? "स्वीकार' गार्डन रेस्टॉरंट आहे, "अतिथी'तलं फूड मस्तच!, "सुरभि'मध्ये कॉंटिनेंटल डिशेस..! चॉईस इज युवर्स! अगदी न संकोचता सांगा...'
संकोचायलाही पुरेसा वेळ नव्हता. जे मला कळत होतं, ते खरं होतं की जे खरं होतं ते मला समजत नव्हतं, कुणास ठाऊक! बागेत फिरायला निघालेला माणूस पाय घसरून तलावात पडावा, तसं काहीसं.

"हे बघा श्रीकांत, तुम्हीच ठरवा.'

"अस्सं कस्सं? तुम्हा आमच्या घरी आलायत नं जेवायला?'

तोच धागा शिताफीनं पकडून मी म्हटलं, "अहो, मग घरीच जेवू या नं. अगदी साधी मुगाच्या डाळीची खिचडीही चालेल; पण घरी जेवू या. घरात जेवायची गंमत वेगळी आहे.'

श्रीकांत-मृदुलाची बोलकी दृष्टभेट टिपायला वेगळ्या कॅमेऱ्याची गरज नव्हती. एकदम स्मार्ट टिचकी वाजवून मृदुला म्हणाली, "वॉव! ही तर बेस्ट आयडिया! घरीच जेवू या. खूप गप्पा होतील. तुम्ही बोलत बसलात की ऐकावंसं वाटतं. बाहेर काय, लगेच उठावं लागतं!'

चला! मी सुटकेचा निःश्‍वास सोडला. खूप आग्रह करून घरी जेवायला बोलावणाऱ्या चाहत्यांच्या घरात मला चक्क "घरचं' जेवायला मिळणार होतं. वेगळ्या हातचं - मनापासूनचं!
ड्रॉवर उघडून मेनूकार्ड काढून तेवढ्यात दोघंही ठरवू लागले : "हे बघ श्री, सुरवातीला हराभरा कबाब असू दे. व्हेज मखनी, रुमाली रोटी, मग पनीर फ्राईड राईस...'

फोनवर ऑर्डर दिली गेली. माझी मुगाची खिचडी मूग गिळून बसली!
श्रीकांत म्हणाला, ""आत्ता अर्ध्या तासात पार्सल येईल. हां, इथल्या "सागर'मधलं फूड बाकी...'
दोघांच्या आतिथ्यात कमतरता नव्हती; पण लिफ्टनं पायउतार होताना मन समाधानानं भरलं नव्हतं. वेळ, प्रवास न्‌ खर्च करून गेलेला माणूस एखाद्याच्या घरी फक्त "पार्सल'चं खाद्य खायला जात नसतो; अगदी साधं; पण ज्यात गृहिणीचं मन मिसळलंय, अशा गोष्टीनं आतिथ्य होतं. अशा मनपरंपरेत वाढलेल्या मला पार्सलपरंपरेशी जुळवून घेताना थकायला होत होतं. एवढा कंटाळा, एवढा औपचारिकपणा असेल तर केवळ पैसे मोजून आतिथ्याचा हव्यास तरी ओढवून घ्यायचा कशाला, या प्रश्‍नाचं उत्तर सापडत नव्हतं. आता कशालाही "व्वा!' म्हणावं तर लगोलग उत्तर येतं - "हे श्रेय माझं नाही. "अन्नपूर्णा'तून आणलंय!'
दिवस "पार्सल'नं सुरू होतो; "पार्सल'नं संपतो. ऑफिसला जाताना निघण्याची तारांबळ म्हणून "चार पोळ्या, 200 ग्रॅम भाजी' पार्सल, तर रात्री घरी जाताना "आता कुठं स्वयंपाकाचा कुटाणा; जातानाच नेऊ या पाव-भाजी पार्सल!'
आजारपण, वार्धक्‍य, एकाकीपण, अचानक, अनपेक्षित आलेले खूप पाहुणे आणि आणखीही काही असे क्षण असतील की जिथं "रेडीमेड पार्सल' आणणं गरजेचं आहे. तिथं ती गोष्ट सुविधा ठरते; पण रग्गड पैसा, भरपूर आळस, लाडावलेलं सुखवस्तूपण, फक्त कंटाळा, चट्टू खाण्याची चटक अशा ठिय्या मारून रुतलेल्या असंख्य घरांतल्या वृत्ती-प्रवृत्तीनं आता नव्या समस्यांची पाळणाघरे सुरू केली आहेत!

घरातलं स्वयंपाकघर म्हणजे फक्त पार्सलचं गोडाऊन झालं तर तिथल्या मुलांचं पालन सुखरूप होईल; पण पोषण मात्र होणार नाही. पालन पदार्थांनी होतं; पोषण भावनांनी! आई-बाबा दोघांचाही ध्यास जेव्हा मिसळतो; तेव्हा ताटातल्या पदार्थांना येणारा सुवास कुठल्याही बिलानं चुकता होणारा नसतो. अगदी घरातलं साधं खिमट लोणचं असेल, फोडणीचा भात असेल, गूळ-चपातीचा लाडू असेल...पदार्थ अगदी साधे! पाच मिनिटांहून वेळ लागणार नाही; पण त्यात एक घर मिसळलेलं असतं. चव त्या घराची असते!

कुणी म्हणेल ः सांगायला काय जातं? हल्लीची मुलं खातात का हे असलं? हल्ली चायनीज हक्का नूडल्सवर हक्कानं ताव मारणारी मुलं आहेत. तुमचं सांगणं कालबाह्य आहे! मजा म्हणून खाण्याचे पदार्थ हेच जर रोजचे खाण्याचे झाले तर घर न्‌ हॉटेल यात वेगळेपण काय उरलं? आणि अन्नपदार्थांतलं सत्त्व फक्त चवीत असतं? की त्याच्या पोषणमूल्यांत? एकत्र मायेनं गुंफून साधं-सात्त्विक जेवण्यात? आता गंमत म्हणून, फॉर अ चेंज म्हणून "घरी' जेवू या, असं म्हणणारी घरं वाढत आहेत. सगळेच काही इतके गर्क नाहीत; पण बटण दाबल्यावर सुख दारात हजर, हा आभास नको त्या दिशेनं घेऊन चालला आहे. अनेक लोक हे ऐकण्याच्याही मनःस्थितीत नाहीत; इतकी रेडीमेड सुखाची सवय पटकन्‌ बेफाम वेगानं वाढत आहे. या सर्व सोईंनी वेळ वाचतो, हे खरंच आहे; पण त्या वाचलेल्या वेळेचं काय करायचं, हे स्वतःपुरतं ठरवायला हवं.

जाहिरातीतले स्टार्च इस्त्रीतले पप्पा-मम्मा न्‌ घरातले आई-बाबा यातला फरक अधोरेखित होतो, छोट्या छोट्या गोष्टींतील आपल्या गुंतवणुकीतून. एखाद्‌ वेळची "सोय' जर "कायमची व्यवस्था' होत असेल तर नातीही पार्सलचीच ठरतील! त्याला फक्त लेबल्स असतील; पण त्यात तिन्हीसांजेच्या आठवणींची ऊर्मी नसेल.

आज जी आळशी, सुखवस्तू घरं पार्सलसंस्कृतीच्या पायावर उभी आहेत, त्यांच्या हाती पार्सलनंच पुष्पगुच्छ येणार! पार्सलनंच केक येणार आणि हॅप्पी बर्थ डेचं एक स्वतःची सहीसुद्धा नसलेलं ग्रीटिंग! त्या वेळी जरा वळून पाहताना, आपण आपलं वात्सल्यही पार्सलनंच पाठवलं होतं, या वस्तुस्थितीची जाणीव असायला हरकत नाही. कृती स्वीकारायची ती परिणामासकट!

आधुनिकता, व्यग्रता कितीही असो; नाती एकमेकांशी वा समाजाशी जोडताना थोडी तोशीस पडतेच. प्रसंगी अडचण, चिडचीड, वैतागही उद्भवतोच. तारांबळ-गोंधळ-श्रमही होतात; पण घर नावाच्या समाजात न्‌ समाज नावाच्या घरात एकमेकांना गुंफताना अनेकदा इतकी सावध अलिप्तता नाही चालत. सिमेंटची अलिप्तता घराच्या पायरीसाठी ठीक; पण सिमेंटमध्ये बीज रुजणार नाही. पहिल्या पावसानं टणक ढेकूळ विरल्यावर त्याची मऊ माती होते. पुढं तेच मातीचं मऊपण बीजांकुरांनी हिरवळून येतं. अनेकदा आयुष्यातही रुक्ष अलिप्तता सोडावीच लागते; नाती एकमेकांत दरवळताना एकमेकांसाठी राबायची तयारी लागते.

आजच्या यंत्रयुगाला विसाव्याचे क्षण परवडणारे नाहीत; हे सगळ्यांनाच कळतं; पण तरीही ओढीनं जमवलेले विसाव्याचे क्षण पुन्हा यंत्राच्या स्वाधीन करणं हे केव्हाही समर्थनीय नाही. एकमेकांतील निरपेक्ष सहजता ओसरली तर "शब्द'सुद्धा "पार्सल'मधून आल्यासारखे उमटतील; पण प्रकटणार नाहीत.
श्रीकांत न्‌ मृदुलानं ओढीनं जे अगत्य केलं, ते त्यांच्या माहिती व तंत्रयुगाच्या संदर्भांना धरून अगदी योग्यच आहे; पण त्या हद्दीपलीकडं भावनांचाही एक सुकोमल प्रदेश असतो. जिथं "मन' व्यक्त करताना मनाचाच आधार घेतला की, एक अपार आनंद असतो, हेही त्यांना समजायला हवं!
दोघांनी खूप सारे पैसे खर्च करून "पार्सल'ने घरचं अगत्य केलं; पण त्याहीपेक्षा घरातला साधा "माझ्यासाठी' केलेला चहा मला अधिक उबदार वाटला असता!

Thursday, December 15, 2011

Innocent Kids Marathi short reading लहान मुले

लहान मुले किती निरागस असतात त्याचा एक अनुभव :

४ वर्षाचा मुलगा (जय).. एकदा सुट्टी मध्ये तो त्याच्या आजी आजोबांकडे राहायला गेला होता. 

त्या दिवशी शिवजयंती होती.. ठीक ठिकाणी मंडप बांधून शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केले होते... महाराजांचे
 पोवाडे सुरु होते... चांगली वातावरण निर्मिती झाली असल्यामुळे

माझ्या आई ने जय ला शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या..
 (तेवढाच त्याच्या मस्तीखोर स्वभावाला control करण्याचा प्रयत्न ..:) जय ने सुद्धा मन लावून गोष्टी ऐकल्या. मग प्रश्न-उत्तर सेशन सुरु झाले..

जय : आजी शिवाजी महाराज खूप चांगले होते ना?

आजी : होय जय.. खूप चांगले होते.

जय : आज त्यांचा 'Happy Birthday' ना?

आजी : होय .

जय : आता ते कुठे आहेत?

आजी : स्वर्गात देव बाप्पा कडे गेले.

जय : ते देव बाप्पा कडे का गेले?

आजी : (थोडा अवघड प्रश्न.. पण आज काल ची मुले खूप हुशार असतात असा विचार करून..) अरे, खूप मोठे झाले ना कि माणूस मरण पावतो आणि मग देव बाप्पा त्याला स्वर्गात आपल्या कडे बोलावून घेतो.

जय : ( थोडा वेळ विचार करून) आजी तू पण खूप मोठी आहेस ना.. मग तू पण आता काही दिवसांनी मरशील... ?
आजी : (काय बोलावे हे न कळून ) ..............................

जय : मेल्यावर तू खूप खुश होशील नाही?

आजी : (प्रश्नार्थी चेहरा) खुश का बरे????

जय : अग, मेल्यावर तू पण स्वर्गात जशील ना आणि तिथ तुला शिवाजी महाराज भेटतील.. मग त्यांना भेटून तू खूप खुश होशील ना......

या उत्तरानंतर आजीला कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करता आली नाही हे सांगायला नको.

Monday, May 9, 2011

Bayako (Baiko) jewha bolat aste बायको जेव्हा बोलत असते

Bayako (Baiko) jewha bolat aste

बायको जेव्हा बोलत असते

बायको जेव्हा बोलत असते
तेव्हा ऐकून घ्यायचे असते
दुसरा आपल्या हातात काय असते

भडका असतो उडालेला अनवट असतो रोष
वाभाडे काढत आपले ती
सांगत असते दोष

आपलेच दोष , आपल्याच चुका
सार सार
स्वीकारायचे असते
दुसरा आपल्या हातात काय असते

शब्दाने शब्द वाढत जातो
भडकत जातो तंटा
म्हणूनच वेळीच लोखायाची असते
आपण धोक्याची घंटा

समोरची तोफ बरसली तर
आपण
तोंड उघडायचे नसते
नाहीतरी दुसरा आपल्या हातात काय असते

गरजून बरसून झाल्यावर
थकून जाते बायको
आग पाखडून झाल्यानंतर
शांत होते बायको
अशाच वेळ विसरून सारे
तिला.....
जवळ घ्यायचे असते ..
नाहीतरी ... दुसरा आपल्या हातात काय असते

तिची चीड चीड तिचा संताप
प्रेमच असते हेही
तिची वटवट तिची कटकट
प्रेमच असते ते ही

तीच प्रेम तिने कराव
आपल
आपण करायचे असते
नाहीतरी........ दुसरा आपल्या हातात काय असते !!!!!!!!

Friday, May 6, 2011

Tari mi mhanato - Mala Majha Job Awadat nahi

Tari mi mhanato - Mala Majha Job Awadat nahi

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

रणरणत्या उन्हाच, कधी पावसाच
तुंबलेल्या पाण्यात काम कधी केल नाही ...
भुकेल्या पोटी , बिन चहाच
काम कधी जमलच नाही..

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

रोजच्या प्रवासात कार तर कधी ५० हजाराची बाईक,
रस्त्यांनी हातगाडी आणि सायकली सुद्धा पाहिल्या नाहीत ..
त्यांच्या पेक्षा सुखी म्हणून स्वतःचा मान सुद्धा मी ठेवला नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

पाच आकडी पगार आणि बँकेत पाच-पाच अकाउंट
पण पाच रुपयाचा साधा वडापाव भुकेल्याला दिला नाही.
ए.सी.मध्ये बसून हॉलिडे प्लानिंग खूप केले, पण
ऐन थंडीत काच उघडून कधी धुक्याला साधा स्पर्श सुद्धा केला नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

बावीस कोटी जॉबलेस अशा धगधगत्या सत्यात
महागाईचा 'म' सुद्धा मला शिवला नाही.
जवळ असलेले प्रेम कधी वाटले नाही ,
कि कोणाचे हसू पाहवले नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

ज्याने हे सर्व दिले, त्याचे रोज आभार सुद्धा साधे मानत नाही .
घराच्या माऊलीची छाया असून गर्व कमी होत नाही.
एकामागून एक शिडी पार करताना मन कुठे धावत होते हेच उमगले नाही.
स्वतः बरोबर,मुलाचा साधा आवडता छंद सुद्धा जोपासता आला नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

आपण काय केले कि त्याने ते पुढे न्यावे?
तिने काय जपावे, जे आपण जोपासले?
मृग नक्षत्र पाहता पाहता ,कधी डोळे दिपले
तरी 'स्व' मला सापडायचा नाही.

Source = Facebook.com http://www.facebook.com/punyalapunechmhanapoonanavhe

Hostel Boys comedy dance on WAKA WAKA -Missing Hostel Days

Missing Hostel Days...

Watch this Video 4 times

1 view for each boy :)

Wednesday, May 4, 2011

Parcel Culture : Parcle Sanskruti :पार्सल संस्कृती प्रवीण दवणे Pravin Dawane

Pravin Dawane
पार्सल संस्कृती सकाळ पेपर मधला रविवारचा लेख
-इ मेल फोरवर्ड

आपण जेवत असतानाच कुणी पाहुणा आला की, हातात ताट घेऊन आत पळत जायची पद्धत तेव्हा आली नव्हती. जे आपल्या पानात, ती चटणी-भाकरी चटकन वाढली जायची आणि भूक असो वा नसो, दोन घास मायेचे स्वीकारून अतिथी तृप्त व्हायचा. आता मनात असूनही बदलत्या जीवनशैलीनं आपले आग्रहही समजूतदार झाले; पण आता समजून घ्यायचं म्हणजे नेमकं किती समजून घ्यायचं, हेच समजण्याची पंचाईत झालेय. अशीच पंचाईत माझी अलीकडं झाली.

अनेक दिवसांचा आग्रह आता दूर लोटणं अवघड झाल्यानं शेवटी श्रीकांत अन्‌ मृदुलाला मी कळवलंच ः "येतो येत्या शनिवारी जेवायला.'
त्यांना झालेला आनंद मला फोनवरही जाणवत होता. केवळ आपण एखाद्याकडं "जेवायला येतोय' म्हटल्यावर समोरच्या माणसाला एवढा आनंद होतो, ही गोष्टच केवढी सुखद आहे.

तासभर आधीच गेलो. थोड्या गप्पा होतील; मग सावकाशीनं जेवण. खरं तर जेवण हे केवळ गप्पांसाठीचं निमित्त. एकमेकांचा मैत्रभाव साधणारा एक रुचकर दुवा! पाच-दहा मिनिटं गप्पा झाल्यावर उत्साहानं श्रीकांत म्हणाला, "तुम्हीच सांगा, कुठलं हॉटेल "प्रीफर' कराल? "स्वीकार' गार्डन रेस्टॉरंट आहे, "अतिथी'तलं फूड मस्तच!, "सुरभि'मध्ये कॉंटिनेंटल डिशेस..! चॉईस इज युवर्स! अगदी न संकोचता सांगा...'
संकोचायलाही पुरेसा वेळ नव्हता. जे मला कळत होतं, ते खरं होतं की जे खरं होतं ते मला समजत नव्हतं, कुणास ठाऊक! बागेत फिरायला निघालेला माणूस पाय घसरून तलावात पडावा, तसं काहीसं.
"हे बघा श्रीकांत, तुम्हीच ठरवा.'
"अस्सं कस्सं? तुम्हा आमच्या घरी आलायत नं जेवायला?'
तोच धागा शिताफीनं पकडून मी म्हटलं, "अहो, मग घरीच जेवू या नं. अगदी साधी मुगाच्या डाळीची खिचडीही चालेल; पण घरी जेवू या. घरात जेवायची गंमत वेगळी आहे.'

श्रीकांत-मृदुलाची बोलकी दृष्टभेट टिपायला वेगळ्या कॅमेऱ्याची गरज नव्हती. एकदम स्मार्ट टिचकी वाजवून मृदुला म्हणाली, "वॉव! ही तर बेस्ट आयडिया! घरीच जेवू या. खूप गप्पा होतील. तुम्ही बोलत बसलात की ऐकावंसं वाटतं. बाहेर काय, लगेच उठावं लागतं!'

चला! मी सुटकेचा निःश्‍वास सोडला. खूप आग्रह करून घरी जेवायला बोलावणाऱ्या चाहत्यांच्या घरात मला चक्क "घरचं' जेवायला मिळणार होतं. वेगळ्या हातचं - मनापासूनचं!
ड्रॉवर उघडून मेनूकार्ड काढून तेवढ्यात दोघंही ठरवू लागले : "हे बघ श्री, सुरवातीला हराभरा कबाब असू दे. व्हेज मखनी, रुमाली रोटी, मग पनीर फ्राईड राईस...'

फोनवर ऑर्डर दिली गेली. माझी मुगाची खिचडी मूग गिळून बसली!
श्रीकांत म्हणाला, ""आत्ता अर्ध्या तासात पार्सल येईल. हां, इथल्या "सागर'मधलं फूड बाकी...'
दोघांच्या आतिथ्यात कमतरता नव्हती; पण लिफ्टनं पायउतार होताना मन समाधानानं भरलं नव्हतं. वेळ, प्रवास न्‌ खर्च करून गेलेला माणूस एखाद्याच्या घरी फक्त "पार्सल'चं खाद्य खायला जात नसतो; अगदी साधं; पण ज्यात गृहिणीचं मन मिसळलंय, अशा गोष्टीनं आतिथ्य होतं. अशा मनपरंपरेत वाढलेल्या मला पार्सलपरंपरेशी जुळवून घेताना थकायला होत होतं. एवढा कंटाळा, एवढा औपचारिकपणा असेल तर केवळ पैसे मोजून आतिथ्याचा हव्यास तरी ओढवून घ्यायचा कशाला, या प्रश्‍नाचं उत्तर सापडत नव्हतं. आता कशालाही "व्वा!' म्हणावं तर लगोलग उत्तर येतं - "हे श्रेय माझं नाही. "अन्नपूर्णा'तून आणलंय!'

दिवस "पार्सल'नं सुरू होतो; "पार्सल'नं संपतो. ऑफिसला जाताना निघण्याची तारांबळ म्हणून "चार पोळ्या, 200 ग्रॅम भाजी' पार्सल, तर रात्री घरी जाताना "आता कुठं स्वयंपाकाचा कुटाणा; जातानाच नेऊ या पाव-भाजी पार्सल!'
आजारपण, वार्धक्‍य, एकाकीपण, अचानक, अनपेक्षित आलेले खूप पाहुणे आणि आणखीही काही असे क्षण असतील की जिथं "रेडीमेड पार्सल' आणणं गरजेचं आहे. तिथं ती गोष्ट सुविधा ठरते; पण रग्गड पैसा, भरपूर आळस, लाडावलेलं सुखवस्तूपण, फक्त कंटाळा, चट्टू खाण्याची चटक अशा ठिय्या मारून रुतलेल्या असंख्य घरांतल्या वृत्ती-प्रवृत्तीनं आता नव्या समस्यांची पाळणाघरे सुरू केली आहेत!

घरातलं स्वयंपाकघर म्हणजे फक्त पार्सलचं गोडाऊन झालं तर तिथल्या मुलांचं पालन सुखरूप होईल; पण पोषण मात्र होणार नाही. पालन पदार्थांनी होतं; पोषण भावनांनी! आई-बाबा दोघांचाही ध्यास जेव्हा मिसळतो; तेव्हा ताटातल्या पदार्थांना येणारा सुवास कुठल्याही बिलानं चुकता होणारा नसतो. अगदी घरातलं साधं खिमट लोणचं असेल, फोडणीचा भात असेल, गूळ-चपातीचा लाडू असेल...पदार्थ अगदी साधे! पाच मिनिटांहून वेळ लागणार नाही; पण त्यात एक घर मिसळलेलं असतं. चव त्या घराची असते!

कुणी म्हणेल ः सांगायला काय जातं? हल्लीची मुलं खातात का हे असलं? हल्ली चायनीज हक्का नूडल्सवर हक्कानं ताव मारणारी मुलं आहेत. तुमचं सांगणं कालबाह्य आहे! मजा म्हणून खाण्याचे पदार्थ हेच जर रोजचे खाण्याचे झाले तर घर न्‌ हॉटेल यात वेगळेपण काय उरलं? आणि अन्नपदार्थांतलं सत्त्व फक्त चवीत असतं? की त्याच्या पोषणमूल्यांत? एकत्र मायेनं गुंफून साधं-सात्त्विक जेवण्यात? आता गंमत म्हणून, फॉर अ चेंज म्हणून "घरी' जेवू या, असं म्हणणारी घरं वाढत आहेत. सगळेच काही इतके गर्क नाहीत; पण बटण दाबल्यावर सुख दारात हजर, हा आभास नको त्या दिशेनं घेऊन चालला आहे. अनेक लोक हे ऐकण्याच्याही मनःस्थितीत नाहीत; इतकी रेडीमेड सुखाची सवय पटकन्‌ बेफाम वेगानं वाढत आहे. या सर्व सोईंनी वेळ वाचतो, हे खरंच आहे; पण त्या वाचलेल्या वेळेचं काय करायचं, हे स्वतःपुरतं ठरवायला हवं.

जाहिरातीतले स्टार्च इस्त्रीतले पप्पा-मम्मा न्‌ घरातले आई-बाबा यातला फरक अधोरेखित होतो, छोट्या छोट्या गोष्टींतील आपल्या गुंतवणुकीतून. एखाद्‌ वेळची "सोय' जर "कायमची व्यवस्था' होत असेल तर नातीही पार्सलचीच ठरतील! त्याला फक्त लेबल्स असतील; पण त्यात तिन्हीसांजेच्या आठवणींची ऊर्मी नसेल.

आज जी आळशी, सुखवस्तू घरं पार्सलसंस्कृतीच्या पायावर उभी आहेत, त्यांच्या हाती पार्सलनंच पुष्पगुच्छ येणार! पार्सलनंच केक येणार आणि हॅप्पी बर्थ डेचं एक स्वतःची सहीसुद्धा नसलेलं ग्रीटिंग! त्या वेळी जरा वळून पाहताना, आपण आपलं वात्सल्यही पार्सलनंच पाठवलं होतं, या वस्तुस्थितीची जाणीव असायला हरकत नाही. कृती स्वीकारायची ती परिणामासकट!

आधुनिकता, व्यग्रता कितीही असो; नाती एकमेकांशी वा समाजाशी जोडताना थोडी तोशीस पडतेच. प्रसंगी अडचण, चिडचीड, वैतागही उद्भवतोच. तारांबळ-गोंधळ-श्रमही होतात; पण घर नावाच्या समाजात न्‌ समाज नावाच्या घरात एकमेकांना गुंफताना अनेकदा इतकी सावध अलिप्तता नाही चालत. सिमेंटची अलिप्तता घराच्या पायरीसाठी ठीक; पण सिमेंटमध्ये बीज रुजणार नाही. पहिल्या पावसानं टणक ढेकूळ विरल्यावर त्याची मऊ माती होते. पुढं तेच मातीचं मऊपण बीजांकुरांनी हिरवळून येतं. अनेकदा आयुष्यातही रुक्ष अलिप्तता सोडावीच लागते; नाती एकमेकांत दरवळताना एकमेकांसाठी राबायची तयारी लागते.

आजच्या यंत्रयुगाला विसाव्याचे क्षण परवडणारे नाहीत; हे सगळ्यांनाच कळतं; पण तरीही ओढीनं जमवलेले विसाव्याचे क्षण पुन्हा यंत्राच्या स्वाधीन करणं हे केव्हाही समर्थनीय नाही. एकमेकांतील निरपेक्ष सहजता ओसरली तर "शब्द'सुद्धा "पार्सल'मधून आल्यासारखे उमटतील; पण प्रकटणार नाहीत.
श्रीकांत न्‌ मृदुलानं ओढीनं जे अगत्य केलं, ते त्यांच्या माहिती व तंत्रयुगाच्या संदर्भांना धरून अगदी योग्यच आहे; पण त्या हद्दीपलीकडं भावनांचाही एक सुकोमल प्रदेश असतो. जिथं "मन' व्यक्त करताना मनाचाच आधार घेतला की, एक अपार आनंद असतो, हेही त्यांना समजायला हवं!
दोघांनी खूप सारे पैसे खर्च करून "पार्सल'ने घरचं अगत्य केलं; पण त्याहीपेक्षा घरातला साधा "माझ्यासाठी' केलेला चहा मला अधिक उबदार वाटला असता!

Sunday, May 1, 2011

संत एकनाथ महाराज एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (हिरवा मुसलमान) त्यांच्यार थुंकला त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडल नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले. शिक्षकांनी हि गोष्ट वर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….? असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली :

१- नाथ किती महान होते ते कळत

२- नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते

३ - माणसाने कस वागाव ते हि गोष्ट शिकवत

४ - एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका

५ - रागावून त्रास तुम्हालाच

६ - शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वरच

७ - दुसरयाला माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे अशी उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता.

शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत, त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली, ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकीनुसारच दिली पण, नाथांची गोष्ट ऐकल्यावर माझ्या लक्षात आल ते अस,

“कि हिंदू समाज तेव्हा हि निद्रिस्त होता आणि आज हि आहे “. शिक्षक म्हणाले, “काय बोलतोस तू…?, नाथांना चूक ठरवतोस…..?”. तो विद्यार्थी म्हणाला, “ नाही गुरुजी मी नाथांना चूक ठरवणारा कोण….?, नाथ जे काही वागले ते त्यांच्या सन्यस्त वृत्तीला साजेसच होत या कृती मुळे ते संत पदाच्या सर्वोच्च स्थानी बसले पण…?, तो यवन जेव्हा १०८ वेळा थुंकत होता त्यावेळी हिंदू समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या गोष्टीचा विरोध करावा असे मुळीच वाटले नाही नाथ संत असले तर तो हिंदू समाज संत नव्हता, जर वेळीच चोप दिला असता तर तो यवन नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता नाथांनी जस त्याचं काम केल तस हिंदूंनी त्याचं काम करण योग्य होत न कि, नाथांच्या या कृतीचा चुकीचा अर्थ विचार लोकात पसरवण.

हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !!

जय हिंद, जय महाराष्ट्र

!!! II मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र-धर्म वाढवावा II

Saturday, April 16, 2011

Pune tithe Kay Une (पुणे तिथे काय उणे )

पुणे तिथे काय उणे..हि घ्या यादि.

नमस्कार मित्रांनो. माझ्या ब्लॉग ला दिवसागणिज प्रतिसाद वाढतच चाललाय आणि त्याच प्रमाणे माझे मराठि टंकलेखन हि सुधारु लागलय. सगळी तुमचीच कृपा.

नुकतेच माझ्या गावाकडे चांगली महिनाभर सुट्टि घालवुन आलो आणि साहित्य-संमेलन हि घराशेजारिच भरले होते त्याचा हि आस्वाद घेतला आता आलोय परत.
रेल्वे स्टेशन च्या बाहेर आलो आणि पहिला विचार मनात आला तो म्हणजे च्यायला का परत पुण्याला आलो हा. पुण्यात येण्या अगोदर प्रत्येकाला वाटते मि पुण्याला चाललो “किती छान”. पण सहा एक महिन्यात माणुस येतो लाईनीवर. आणि बर्याच जणांना फ़ोन वर हेच सांगतो..”पुण्यात काय मजा नाही राव, नुसते गाडिंचे आवाज त्या ट्राफ़िक ची कटकट.” ज्याला ट्राफ़िक ची कटकट हि अतिशोयक्ती वाटते त्याने पुण्यात गाडि चालवुनच बघावी.

पुण्यातले रस्ते हा बातम्यांचा विषय होता. खड्यात रस्ता म्हणजे काय हे पाहण्या साठि खास अभ्यास सहली येऊन गेल्या..असे म्हणे बाबा. खास पाठिचे आणि हाडांचे विकार यावर चर्चासत्रे घेउन काहि लोकांनी आपल्या स्वताःच्या म्हातारपणाची तरतुद करुन ठेवली. नुसते पेपर मधुन लेख आणि फ़ोटो येत होते कॉमन-मॅन मात्र ढिम्मं. घेतोय रोज आपलीच .. शेकुन.
पण हां आता परिस्थिती चांगली नसली तरी बरि आहे. लाजे खातर का होइना पण रस्ते केलेत डांबरी. पण आता नविनच टुम निघालीए रस्ते कॉंक्रिटीकरणाची. रस्ते कॉंक्रिट चे करणार आहेत. करा चांगलच आहे पण (च्यायला हा ’पण’ दर वेळि येतोच) गावातले सगळे रस्ते एकदमच खणायचे? पुण्यात गल्लो-गल्ली तुम्हाला दिसतील ते म्हणजे ’खुदा हुआ रस्ता और टुटा हुआ दिल’..जाउदे ते दिल वगैर भानगडित आपण आत्ता पडायला नको. आणि आहेत तेहि रस्ते किती पुरतात? नुसत्या एकमेकाला चिकटवुन गाडि चालवायला जमत नाही म्हणुन अंतर ठेवल्या सारखे करायचे. ते ’पी.एम.टी’ चे ड्रायवर तर रिटायरमेंट नंतर नक्किच सर्कस मध्ये जाउन त्या लोकांना ’सर्कशीत गाडि कशी चालवावी’ हे शिकवत असणार.
बाईक वाले तर अगदि धुम-मचाले-धुम. आणि खास करुन ’त्याच्या’ मागे जर ’ती’ बसली असेल तर विचारयलाच नको. या जोड्यांचा वेग बघुन हि पळुन जाऊन लग्न वगैर करायच्या बेतात आहेत कि काय अशी शंका मनात उगीचच डोकाउन जाते. सिग्नलचा लाल दिवा तर रिक्शा वाल्यांसाठी थट्टेचाच विषय. रस्त्याच्या कडेला लोके थांबवुन ठेवलेली असतात आणि मंत्र्यांचा ताफ़ा वेगाने निघुन जातो कदाचित हा मंत्रीपणाचा फ़िल मिळवण्यासाठि सगळि लोकं सिग्नलला थांबलेली असताना रिक्शा वाले मात्र आपला ताफ़ा घेउन भुर्रदिशी निघुन जातात. नुसती वाट लागलीए रसत्यांची. मुले, वृद्ध लोके रस्ता ओलांडणार कसा याचा विचार वेळेच्या कमतरते अभावी केला नसाव.

रोज शेकड्याने नविन गाड्या रस्त्यावर येतायत. कारण एकच बस मध्ये जागा नाहि आणि पाहिजेल तेंव्हा पुर्ण बसच नाहि. एकदा डेक्कन-वारजे हि बस संध्याकाळि रस्त्या वरुन जाताना पहावी. हि बस एवढे लोकं घेउन पुढे जाऊ शकते…. हे बघुन बस बनवणार्या टाटांचे हि डोळे पांढरे होतील, हि अवस्था. कोण आपल्या गाड्या सोडुन बसनं जायचा विचार करणार?

घराचे बोलावे तर ........
पुढचे पान
.

पुणे तिथे काय उणे..हि घ्या यादि

Sunday, April 3, 2011

Rajya karawe tar Shivaji Maharajan sarakhe राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं

कणेकर यांचा 'सामना' मधील लेख

राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं

शूर असावं तर राणा प्रतापसारखं.

स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं.

देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं.

कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं .

हुशार असावं तर बिरबलासारखं .

धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं.

करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी.

सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं.

सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख.

राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं.

बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं.

समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.

अष्टपैलू लेखक असावं तर जयवंत दळवीसारखं.

देशाला ललामभूत ह्वाव तर बिल गेट्ससारखं.

निरलस सेवार्थी ह्वाव तर डॉ.तात्यासाहेब लहानेसारखं.

शब्दांचे बुडबुडे फोडावेत तर कॉंग्रेससारखं.

राष्ट्रभाषेचे धिंडवडे काढावेत तर ममता बनेर्जीसारखे.

लग्न न करता नुसतच बिनधास्त बरोबर रहाव तर बिपाशा बसूसारखं .

लग्नाशिवाय झालेली मुलगी खुल्लम खुल्ला वाढवावी तर नीना गुप्तासारखी.

खमक्या असावं तर लालू प्रसादसारखं.

लफडेबाज असावं तर टायगर वूड्ससारखं.

लग्न करावीत तर एलिझाबेथ टेलरसारखी.

उद्योगपती ह्वाव तर टाटासारखं.

सहकुटुंब यशस्वी ह्वाव तर अमिताभ बच्चनसारखं.

अनाकलनीय लिहाव तर ते ग्रेससारखं.

व्यंगचित्रे काढावीत तर ती आर.के.लक्ष्मणसारखी.

बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं .

गझल गावी तर मेहंदी हसनसारखी.

घर असावं तर मुकेश अंबानीसारखं.

बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.

चालीचा चोर असावं तर अन्नू मलिकसारखं.

भ्रष्टाचारी असावं तर इंडियन मेडिकल कौन्सिलचा अध्यक्ष केतन देसाईसारखं.

बोलबच्चन असावं तर अरुण जेटलीसारखं.

प्रेमवीर असावं तर शोऐब मलिकसारखं.

निर्ल्लज कामांध असावं तर किचकासारखं किंवा शायनी आहुजासारखं

प्रेक्षक नाहीत हे कळून सुद्धा सिनेमे काढावेत तर देव आनंदसारखं.

बाईने रूपवान व 'ग्रेसफुल' असावं तर गायत्री देवीसारखं.

बाईन कस नसाव तर राखी सावंतसारखं .

निर्विष विनोद करावा तर पु.ल.देशपांडेसारखा.

लग्न करून सुखी ह्वाव तर माधुरी दीक्षितसारखं.

लग्न करून दुखी ह्वाव तर अदनान सामीसारखं.

दुसरी बायको करायची तर हेमा मालीनिसारखी.

त्रेचाळीस वय झाल तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकऱ्यांच्या मागे उंडरत फिरायचं तर सलमान खानसारखं.

बाबा आदमच्या जमान्यात लिहलेल्या एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तूप लावून फिरायचं तर भालचंद्रनेमाडेसारखं.

बाबा आदमच्या जमान्यात काढलेल्या एका चित्रपटाच्या जीवावर आजही टेचात फिरायचं तर रामदासफुटाणेसारखं.

आनंदात व उत्साहात जगायचं तर यशवंत देवांसारखं.

रडत आणि कटकट करीत जगायचं तर माझ्यासारखं.

Friday, March 11, 2011

क्रिकेट विरुद्ध प्रेयसी Cricket Vs Girlfriend

१) पुढचा सर्व महिनाभर मी फक्त माझ्या मित्रांशीच जास्तीत जास्त वेळ बोलेन. त्यांच्या घरी मॅच पहायला जाईन किवा त्यांना माझ्या घरी बोलवेन. त्यामुळे तुला माझ्यासाठी वेळच नाही अशी भुणभुण करायची नाही. केल्यास दुर्लक्ष केले जाईल.

२) माझा फोनही याकाळात बिझी असेल. तेव्हा फोन घेतला नाही म्हणून सतत करायचा नाही. एसएमएस पाठवायचे नाहीत. इग्नोरच केले जातील. फोन बिझी असला तर मी क्रिकेटवर चर्चा करतोय असे समजून गप्प बसायचे.

३) याकाळात मी तुला भेटेनच असे नाही. मॅच बुडवून तुला भेटायला येण्याचे कष्ट मी घेणार नाही. पण तरी समजा, एखाद्या दिवशी मी भेटलोच, आलोच एखाद्या मॅचच्या दिवशी आणि नाही फार बोललो तर त्याचे भलतेसलते अर्थ काढायचे नाहीत. तुझे माझ्यावर प्रेमच नाही, तू दुसरीकडे कुठं अडकलास का, तू का असा वागतोस माझ्याशी?, अशी भंकस करायची नाही. मी काहीही ऐकून न घेता निघून जाईन आणि मग वर्ल्डकप संपेपर्यंत भेटणार नाही.

४) भेटणे, जेवायला जाणे, पार्ट्या, तुझ्या मैत्रिणींचे वाढदिवस असे सगळे कार्यक्रम रहित करण्यात येतील. कुठल्याही प्रकारचा आग्रह करण्यात येऊ नये.

५) एक महत्वाचं – तुला क्रिकेटमधलं काहीही कळत नाही, असं सांगण्याची वेळ माझ्यावर आणायची नाही. “आज कोणाची मॅचे…?” असं लाडात येऊन विचारल्यास आपलं ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. किमान रोजचा पेपर वाचायचा, किमान भारताची मॅच कधी आहे हे पहायचं. आणि प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत.

६) मुलींना फारसं क्रिकेट कळत नाही हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे उगीच आपल्याला फार कळतं, अशा अविर्भावात माझ्याशी चर्चा करायला यायचं नाही. चर्चा केली जाईल, पण तेव्हा मी जे काही सांगतोय ते केवळ भक्तीभावानं ऐकून घ्यायचं. क्रिकेटविषयी क्रिकेट सोडून बोलायला तू काही मंदिरा बेदी नाहीस हे लक्षात ठेवायचं.

७) मी मॅच पाहत असताना फोन करुन ‘रोमॅण्टिक’ गप्पा मारण्याचा प्रयत्नही करायचा नाही. मॅचमधला रोमॅण्टिसिझम मला पुरतो.

८) सचिन तेंडुलकर कितीही आवडत असला तरी “ए, सचिन मारेल का आज सेंच्युरी…?” असले बावळट प्रश्न विचारायचे नाहीत. बावळट यासाठी की तेव्हा सचिन नाही तर सेहवाग किंवा युसुफच क्रिझवर असतो. उगीच 'स्मार्ट'नेस दाखवायचा नाही.

९) प्रेमापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं असतं, हे तू लक्षात ठेव. त्यामुळे “तूला माझ्यापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं वाटतं का…?” असा प्रश्न विचारायचा नाही. मी होकारार्थी उत्तर दिल्यास परिणामांना मी जबाबदार राहणार नाही.

१०) सगळ्यात महत्वाचं – हे सगळे नियम पाळले गेल्यास आणि माझ्या मनाप्रमाणे सगळ्या मॅचेसचे निकाल लागत गेल्यास मी कधीमधी एखादा फोन करीन (आणि ते ही थोडावेळच).

Girlfriend to her Boyfriend

जर ह्या mail चे reply त्या मुलाच्या girlfriend ने दिले तर ती कशी देईल???

एक नमुना :

तशी मला तुला उत्तर लिहायची अजिबात इच्छा नाहीये पण तुलाही समजू देत कि मी काय विचार करते ते. OK, let’s come to the point. तुझ्यासारखे रामायण लिहायला माझ्याकडे वेळ नाही. क्रिकेट संपल्यावर भारत जिंकला म्हणून party करायला त्या सचिन, सेहवाग किंवा युसुफ कडेच जा. माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नसणार आहे, हे लक्षात ठेव आणि चुकून भारत हरला तर माझ्याकडे रडत यायची गरज नाही. मंदिरा कडे गेलास तरी माझी हरकत नाही. तुझ्या आयुष्याला पुरेल एवढे प्रेम तू तुझ्या त्या फडतूस क्रिकेट वर कर आणि वेळ वाया घालवणाऱ्या त्या क्रिकेट सोबतच लग्न कर. उगाच माझी अपेक्षा ठेवू नकोस. कारण मी मनुष्यप्राणी आहे रोबोट नाही – वेळीच play & pause व्हायला...

एक महत्वाचे – तुला जर वाटत असेल कि जगात तू एकटाच मुलगा राहिला आहेस तर तू चुकीचा विचार करतोयस... खरं तर ८०० मुली मागे १००० मुल फिरताहेत, हे लक्षात ठेव. ;)

जास्त समजावून सांगण्यात मी वेळ वाया घालवत नाही कारण तुला तेवढी समज नाहीच... चुकून क्रिकेट तेवढे कळते. नवल आहे...!!

एक सूचना: ह्या कथेतील सगळे पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा कुठल्याही घटनेशी किंवा व्यक्तीशी काहीही संबंध नाही. असल्यास तो एक योगायोग समजावा.

Friday, December 17, 2010

Mc'Donalds - Pune Branch मॅकडोनाल्ड्स - पुणे ब्रांच - पुणेरी पाट्या -

मॅकडोनाल्ड्स - पुणे ब्रांच - पुणेरी पाट्या -

पुणेरी पाट्या' संस्कृतीचे आक्रमण 'मॅकडोनाल्ड्स' वर झाले तर ?

1. आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.

2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये - हुकूमावरून)

3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.

4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठी बसायची सोय.

5. टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरेविंचरू नयेत.

6. टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.

7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: १९ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: ४६फ्राईज)

8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)

9. पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.

10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.

11. विनाकारण सॉस मागू नये. टमाटू फुकट येत नाहीत.

12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याचीनोंद घ्यावी.

13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.

14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.

15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये - हुकूमावरून)

16. आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)

17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.

18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.

Source = http://mannmajhe.blogspot.com/

Sunday, December 12, 2010

Muliche Lagna मुलीचे लग्न

लग्नाच्या सुट्टीनंतर ब्लोग्गिंग ची सुरुवात करतोय

ब्लोग्गिंग ची सुरुवात करायची होतीच
विषय मिळत नव्हता

मुलीचे लग्न हा पालकांसाठी एके काळी चिंतेचा विषय होता.

आज चित्र नेमके उलटे झाले आहे,

आणि हा बदल पचवण वर्पक्षासाठी अवघड जात आहे.

हे नेमेके काय आहे?

सकाळ पेपरचे नशीब मी आज तो आणला आणि वाचला सुद्धा म्हणून तर विषय मिळाला.........

विषय आहे... मुलींचे वाढते भाव

२००८ - २०१० मध्ये मुलीच्या लग्नाचे ठोकताळे बदलतच आले आहेत त्याचाच पुरावा म्हणजे खालची चित्रे आहेत.

चित्रे वाचायचे असतील तर त्यावर टीचकी मारणे...

Friday, November 12, 2010

Maharashtra Mulinche Prakar महाराष्ट्रीयन मुलींचे प्रकार

महाराष्ट्रातील
मुलींचे प्रकार ......

आज आम्ही आपल्याशी
"मुली" या अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. या विषयावरचा आमचा अभ्यास हा अत्यंत गाढा आहे. उपरोक्त विषय वाचून तमाम स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असणार. पण आमच्या घरचा पत्ता आम्ही कुठेही नमूद करणार नसल्यामुळे त्यांची थोडी पंचाईत होईल. आय पी ट्रेस केला तर परदेशातून आलेले ट्राफिक सापडेल... त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. कुणी आमच्या मताशी सहमत असावे असा आमचा आग्रह नाही. आमचा लेख वाचून कुठल्या मान्यता काढून घेतलेल्या डीम्ड विद्यापीठाला आम्हाला Ph D द्यावीशी वाटली तर त्यांनी ती डिग्री विद्यापीठाच्या दारात लटकावून ठेवावी (आम्ही किंवा आमचे हितचिंतक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतील).

तर आम्ही आज इथे महाराष्ट्रातील
मुलींची प्रांतानुसार विभागणी करणार आहोत. प्रत्येक प्रांतातील मुलीचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. साहजिक आहे , एखादी मुलगी तिच्या प्रांतानुसार केलेल्या वर्णनाशी असहमत असू शकते. तिने मनातल्या मनात म्हणावे "मी नाही इकडची , मी तर तिकडची"....शेवटी प्रत्येक नियमाला अपवाद असतातच.

चला विषयाकडे वळू... तर पहिला
प्रकार आहे "संसारंइतिकर्तव्यं कुमारिका " .... या प्रकारच्या मुली पक्क्या गावाकडच्या. नेटाने संसार करणाऱ्या ... यांनी जीन्स घातली तर यांना पूर्ण जग आपल्याकडेच पाहते आहे असा भास होतो. तुमचं सहजच त्यांच्याकडे लक्ष जरी गेले तरी मैत्रिणीच्या कानात पुटपुटतील "बघतोय बघ कसा, लोचट मेला ...." या मुलींना जेवढा भाव द्याल तेवढा त्या भाव खातील. म्हणून यांना कायम दुर्लक्षित भासवावे. त्यामुळे तुमचा भाव वधारतो. या प्रकारच्या मुली सातारा , सांगली , कोल्हापूर या प्रांतात सापडतात. या गृहकर्तव्यदक्ष असतात. अशा मुलींशी लग्न केल्याने संसार नीटनेटका होण्याचा जास्त संभव आहे. फक्त तुमच्या स्वत:च्या घरात तुम्ही TV वर जे पाहाल ते प्रत्यक्षात होताना दिसेल.... लग्नाआधी TV चा रिमोट शेवटचा हाताळून घ्या कारण नंतर ते तुमच्यासाठी मृगजळ असेल. समोर रिमोट दिसेल पण त्याच्यापर्यंत कधीही पोहोचता येणार नाही.

दुसरा प्रकार आहे
"आंग्लमातृभाषासंभ्रम कुमारिका " ... इंग्रजाळलेला मराठी बोलणाऱ्या मुली प्रामुख्याने या गटात मोडतात. ह्यांची आई ममा असते आणि बाबा dad ... आम्ही अशा मुलींसाठी एक संज्ञा सुचविलेली आहे "MBCM" म्हणजे Mumbai born confused maharashtriyan ... आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि आपण मुंबई आणि उपनगरातील मुलींविषयी बोलत आहोत. ह्यांना पटवण्यासाठी तुम्ही "cool" असणे फार निकडीचे आहे. तुम्हाला सिगारेट, दारू यांची सवय लावावी लागेल नाहीतर तुमच्या पैश्याने ह्या दारूच्या आख्या बाटल्या रिचवतील. ह्यांना मुलांचे लक्ष खेचून घेण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत ... ह्यांचे कपडे हा संशोधनाचा विषय असू शकतो. यांचा स्कर्ट ६ वर्षाच्या मुलीला फिट्ट बसतो. म्हणूनच या प्रकारच्या मुलींची लग्ने अमराठी मुलांशीच जास्त होतात. चुकून तुम्ही यांच्याशी लग्न कराल तर मंगलाष्ट्कातील सावधान अवधूत गुप्ते च्या म्युझिक सोबत आयुष्यभर मागे लागेल आणि वणवा कुठे पेटलाय ते सुद्धा समजणार नाही.

तिसरा प्रकार
"कुत्स्वादिनाप्मानम कुमारिका" ... ह्यांना विशेष धन्यवाद !!! महाराष्ट्रातील मुलींच्या बुध्यान्काची सरासरी थोडीफार जास्त आहे ती यांच्यामुळेच !!! इतर ठिकाणी प्रेयसीकडून कोड कौतुक करून घेण्याची पद्धत असते. इथे प्रत्यक्ष या रणचंडीवर स्तुतिसुमने उधळल्याशिवाय ती प्रसन्न होणे अशक्य .... तिच्या लेखी तुम्ही जगातील ३ नंबरचे सदगृहस्थ असता ...(तिच्या पिताश्री आणि भ्राताश्री नंतर)...प्रथम बोलण्यात पुढाकार घ्याल तर तुमचा किमान शब्दात कमाल अपमान होणार यात शंका नाही. अशा वेळेस तिचा भाऊ किती महान आहे यावर कमीतकमी २० मिनिटे बोलण्याची पूर्वतयारी करून जा. ओळख होईल .... हो... नुसती ओळख ... ह्या मुलींचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या घरापासून सुरवात करावी. नियमित मुलीच्या घरी जावे. तिच्या बाबांबरोबर "अमेरिकेची आर्थिक परिस्थिती" यासारख्या गंभीर विषयावर चर्चा करावी. कदाचित एखाद्या दिवशी पोहे मिळतील ... हाच तो दिवस .... दुसऱ्या दिवशी सरळ लग्नाची मागणी घालावी. अशा मुलींशी लग्न केल्याने तुमची आर्थिक भरभराट होते ... उत्तरोत्तर प्रगती होते कारण तुमच्या चुका यांच्या इतक्या दुसऱ्या कोणालाही दिसत नाहीत ... अगदी तुमच्या बॉस ला सुद्धा ....
सांगायची गरज आहे
... ह्या पुण्याच्या मुली .... वरील उपाय आमच्या एका कोकणस्थ मित्राने घाऱ्या डोळ्याची सदाशिव पेठेकरीण पटवण्यासाठी वापरलेला आहे ... १०० % रिझल्ट !!!

चौथा प्रकार
"मातृपितृवाक्यप्रमानं कुमारिका " ... महाराष्ट्रातील मुलींची बौद्धिक सरासरी घसरलेली आहे ती यांच्यामुळे...!!! या मुलींना विचाराल "तुझे माझ्यावर प्रेम आहे का ??" तर उत्तर येईल "आईला विचारून सांगते... " यांच्याशी लग्न करणे सर्वात सोपे ... सरळ सरळ आपल्या पिताश्रींना तिच्या घरी न्यावे ... कमीतकमी २५ लाख हुंडा मागावा ... हुंडाही मिळेल आणि मुलगी ही .... घरात तुमचे वाक्य प्रमाण असेल ... मोलकरीण बनवा नाहीतर मालकीण ...मर्जी तुमची !!! या मुली मराठवाड्यात अधिक सापडतात.

महाराष्ट्र शासनाप्रमाणे विदर्भाला
सापत्न वागणूक देण्याची आमची इच्छा नव्हती. पण विदर्भकन्यांनी "आमच्यावर स्वतंत्र लेख हवा" असा आमच्याकडे हट्ट धरला आहे. शासनाला वेगळा विदर्भ देणं जमेल न जमेल .... आम्ही वेगळा लेख लिहिण्याचा आश्वासन जरूर देतो.

:):):)

Wednesday, October 6, 2010

Marathi madhey suddha spellling mistake मराठी मधे स्पेल्लिग़ मिसटेक

जर का हा कलाकार माणूस सापडला तर तुम्ही काय कराल त्याचे ?

जर का हा माणूस सापडला तर तुम्ही काय कराल त्याचे ?

Friday, September 24, 2010

Poem for Lazy non active employee- Tari mi mhanato -majha job mala awadat nahi तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

रणरणत्या उन्हाच, कधी पावसाच
तुंबलेल्या पाण्यात काम कधी केल नाही ...
भुकेल्या पोटी , बिन चहाच
काम कधी जमलच नाही..

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

रोजच्या प्रवासात कार तर कधी ५० हजाराची बाईक,
रस्त्यांनी हातगाडी आणि सायकली सुद्धा पाहिल्या नाहीत ..
त्यांच्या पेक्षा सुखी म्हणून स्वतःचा मान सुद्धा मी ठेवला नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

पाच आकडी पगार आणि बँकेत पाच-पाच अकाउंट
पण पाच रुपयाचा साधा वडापाव भुकेल्याला दिला नाही.
ए.सी.मध्ये बसून हॉलिडे प्लानिंग खूप केले, पण
ऐन थंडीत काच उघडून कधी धुक्याला साधा स्पर्श सुद्धा केला नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

बावीस कोटी जॉबलेस अशा धगधगत्या सत्यात
महागाईचा 'म' सुद्धा मला शिवला नाही.
जवळ असलेले प्रेम कधी वाटले नाही ,
कि कोणाचे हसू पाहवले नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

ज्याने हे सर्व दिले, त्याचे रोज आभार सुद्धा साधे मानत नाही .
घराच्या माऊलीची छाया असून गर्व कमी होत नाही.
एकामागून एक शिडी पार करताना मन कुठे धावत होते हेच उमगले नाही.
स्वतः बरोबर,मुलाचा साधा आवडता छंद सुद्धा जोपासता आला नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

आपण काय केले कि त्याने ते पुढे न्यावे?
तिने काय जपावे, जे आपण जोपासले?
मृग नक्षत्र पाहता पाहता ,कधी डोळे दिपले
तरी 'स्व' मला सापडायचा नाही.

source email forwards