त्याला भारतीय सरकार ने पुढच्या वर्षी फाशी द्यायचे ठरवले आहे , परंतु त्या आधी कसाब चे असे किती वाढदिवस 'आय.एस.आय.' सहित संपूर्ण भारताला साजरे करावे लागतील माहित नहीं .....
आता स्वत:चे रक्षण स्वत:च करा!- बाळासाहेब ठाकरे
आता जनतेने सरकारवर विसंबून न राहता स्वत:चे रक्षण करावे. दहशतवादी दिसले की, हातात मिळेल त्या शस्त्राने त्यांना खतम करावे, अशी आवाहन करणारी प्रतिक्रिया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. राज्याला दळभद्री आणि अत्यंत कुचकामी सरकार लाभले असून त्याचीच जनता फळे भोगत आहे, असा संताप शिवसेनाप्रमुखांनी व्यक्त केला आहे.
दहशतवादी कसाब जेलमध्ये मजेत असून अफझल गुरूला फाशीची शिक्षा होऊनही त्याचा एकही केस वाकडा झालेला नाही. सरकारमधील असल्या लोकांकडून कसल्या अपेक्षा ठेवायच्या?... कायद्याचा दराराच उरलेला नाही. अशात जनता काय करणार? मेणबत्त्या लावून निषेध करायचा? हिंदू तरी काय करणार, जीव धोक्यात घालून तो जगत आहे. बॉम्बस्फोटात मरण येत नाही, तोपर्यंत जगा, हाच काँग्रेसचा संदेश आहे. सत्तेचा अतिरेक झाल्यानेच दहशतवादी माजले आहेत, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुखांनी केंद आणि राज्य सरकारच्या नाकतेर्पणावर टीका केली.
यात आपला नंबर लागला नाही........आजचे मरण उद्यावर बाकी काय...
१४ फेब्रुवारी १९९८ : कोइंबतूर , १३ बॉम्बस्फोट , ४६ मृत्यू , २०० जखमी.
०१ ऑक्टोबर २००१ : जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर स्फोट , ३५ मृत्यू.
१३ डिसेंबर २००१ : नवी दिल्ली , संसदेवर हल्ला , १२ मृत्यू , १८ जखमी.
२४ सप्टेंबर २००२ : अहमदाबाद , अक्षरधाम मंदिरावर हल्ला , ३१ मृत्यू , ७९ जखमी.
१४ मे २००२ : जम्मू लष्करी तळावर हल्ला , ३० मृत्यू.
१३ मार्च २००३ : मुंबईमध्ये रेल्वेत स्फोट , ११ मृत्यू.
२५ ऑगस्ट २००३ : मुंबई , ५२ मृत्यू , १५० जखमी.
१५ ऑगस्ट २००४ : आसाम , १६ मृत्यू.
२९ ऑगस्ट २००५ : दिल्ली , साखळी बाँम्बस्फोट , ५९ मृत्यू.
०७ मार्च २००६ : वाराणसी , साखळी बाँम्बस्फोट , २८ मृत्यू.
११ जुलै २००६ : मुंबई , उपनगरी रेल्वेत ११ मिनिटात ७ स्फोट , २०९ मृत्यू , ७०० जखमी.
१८ मे २००७ : हैदराबाद , मशिदीत स्फोट , १३ मृत्यू.
२५ ऑगस्ट २००७ : हैदराबाद , स्फोटात ४२ मृत्यू.
०८ सप्टेंबर २००८ : मालेगावात स्फोट , ३७ मृत्यू.
१३ सप्टेंबर २००८ : दिल्लीत साखळी बाँम्बस्फोट , २४ ठार , १०० जखमी.
२७ सप्टेंबर २००८ : दिल्ली , १ ठार , २३ जखमी.
२१ ऑक्टोबर २००८ : इंफाळ , मणिपूरमध्ये स्फोट , १७ मृत्यू.
३० ऑक्टोबर २००८ : आसाम , बाँबस्फोट , ७७ मृत्यू , १०० जखमी.
२६ नोव्हेंबर २००८ : मुंबईवर अतिरेक्यांचा हल्ला , सीएसटी , ताज आणि ओबेरॉय या हॉटेलात झालेल्या गोळीबारात १७० जणांचा मृत्यू .
१३ फेब्रुवारी २०१० : पुण्यात बाँम्बस्फोट , १० ठार.
२५ मे २०११ : नवी दिल्ली हायकोर्टाच्या आवरात स्फोट, जीवीतहानी नाही...
No comments:
Post a Comment