Monday, July 4, 2011

OBC TO OBC free BSNL OFFER


ओ बी सी लोकांनी भरपूर गप्पा माराव्या असा ह्या प्लान  चा हेतू दिसतोय.


"बीएसएनएल"ने "कनेक्‍टिंग ओबीसी मिशन' हाती घेतले असून, राज्यातील ओबीसी समाजाच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क "ओबीसी टू ओबीसी - अनलिमिटेड फ्री ग्रुप कॉलिंग'ची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे "ओबीसी' असलेल्या सर्वांना फुकटात गप्पा मारता येतील. मंडल आयोगाच्या अहवालात समाविष्ट करण्यात आलेल्या ओबीसींच्या 357 जाती या योजनेत एकमेकांशी जोडण्याचा हा प्रकल्प आहे.


ह्या आधी सुद्धा मोबाईल कंपन्यांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी  वयाचा , व्यवसायाचा, गरिबीचा , अपंगत्वाचा  नात्यांचा वापर केला आहे  परंतु हा नवीन प्रकार जरा अजबच आहे ! ..

राजकारणात जसा जातीचा वापर करून फायदा करून घेतला जातो तसेच आता ह्या पुढे व्यवसायाच्या फायद्यासाठी जातीचा वापर सुरु होणार असे दिसते आहे ... जागतिकीकरणात हे असे चालायचेच 


मराठी टू मराठी फ्री करा की राव. ओबीसी टू ओबीसी फ्री करून तुम्ही जाती-पातींमध्ये भेदभाव करता, असेच सिद्ध केले आहे. पण उपयोग नाही. नेटवर्क कुठे मिळते बीएसएनएलचे?

आता पीएमपीएमएल बसमध्येही 4 आसने ओबीसींसाठी, 4 आसने अनुसूचित जातींसाठी, 4 आसने अनुसूचित जमातींसाठी, 4 आसने भटक्‍या व विमुक्तांसाठी, 25 टक्के महिलांसाठी राखीव आणि खुल्या गटांसाठी 10 आसने, असे लिहिलेले आढळून आल्यास दचकू नका!



BSNL ने नवीन प्लान काढण्यापेक्षा चांगले नेटवर्क पुरवण्यात लक्ष घातले तर त्यांची आणि भारताची सुद्धा ह्या क्षेत्रात प्रगती होऊ शकते 








अधिक वाचन येथे उपलब्ध आहे

http://www.esakal.com/esakal/20110705/4675608378639242618.हतं

मूर्ख  टू  मूर्ख फ्री

http://www.esakal.com/esakal/20110705/4720180311286511096.हतं


-इसकाळ

No comments:

Post a Comment