Saturday, March 3, 2012

Leap Year By Omkar K. Deshmukh लीप यिअर आणि अधिक मास

लीप यिअर आणि अधिक मास याविषयी थोडेसे

...
इंग्रजी वर्षात ४ वर्षांतून एकदा फेब्रुवारी महिन्यात एक दिवस अधिक येतो, याला लीप यिअर म्हणतात तर, मराठी(शक संवत्सरात) दर तीन वर्षांनी एक महिना अधिक येतो त्याला 'अधिक किंवा धोंडे मास' असे म्हंटले जाते. यावर्षात हे दोन्ही आले आहेत. नेमके काय आहे लीप यीअर आणि अधिक मास? जाणून घेऊयात...!!

लीप यिअर


पूर्वी इंग्रजी कालगणनेमध्ये सर्वच महिने हे ३० दिवसांचे होते.
पण रोमन सम्राट जुलियस सीझरच्या काळात एक महिना त्याच्या नावाने असावा असा ठराव रोमन संसंदेने संमत केला. त्याचबरोबर हा महिना ३१ दिवसांचा असावा असाही ठराव संमत झाला. ह्या ठरावाची परिणीती म्हणजेच जुलै महिन्याचा जन्म होय. तो ३१ दिवसांचा झाला. पण हा वाढलेला एक दिवस कुठून आला? तर तो फेब्रुवारीतून काढून घेण्यात आला होता. म्हणून फेब्रुवारी हा २९ दिवसांचा झाला.


जुलियस नंतर सत्तेवर आलेल्या ऑगस्टस सीझरने देखील आपल्या नावाने एक महिना असावा आणि त्यात पण ३१ च दिवस असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचा पराक्रम आणि कर्तृत्व पाहून त्याची हि मागणी मान्य झाली आणि ऑगस्ट हा महिना उदयाला आला तो पण ३१ दिवसांचा. अर्थात याही वेळी एक दिवस फेब्रुवारीतूनच कमी करण्यात आला आणि फेब्रुवारीला २८ दिवसच वाट्याला राहिले.

त्यानंतर असे लक्षात आले की, आपली कालगणना काहीशी चुकीची आहे. त्यात बदल करावे लागतील. असे वाटण्याचे कारण सूर्य पद्धतीवर चालणारी ग्रेगोरीअन दिनदर्शिका ही ३६५ दिवसांची आहे, असे समजले जात होते. पण ग़लिलिओ, आदी प्रभृतींनी वर्ष ३६५ दिवसांची नसून ३६४ दिवस आणि १८ तासांचेच असल्याचे सांगितले. यावर उपाय म्हणून मग पुन्हा फेब्रुवारीला मध्ये घालण्यात आले. दरवर्षी पडणारी ६ तासांची तुट ४ वर्षांतून एकदा १ दिवस अधिक मोजून भरून काढण्याचे ठरले. हा मान फेब्रुवारीला मिळाला. अशाप्रकारे सध्याची ग्रेगोरीअन दिनदर्शिका मूर्तरुपास आली.

अधिक मास

अधिक मास मराठी किंवा शक कालगणना ही सौर पद्धतीवर आधारित नसून ती चांद्र पद्धतीवर आधारित आहे. त्यामुळे या कालगणनेत ३६४ दिवसांचे वर्ष नसून ते केवळ ३५५ दिवसांचे आहे. पण ह्यामुळे दरवर्षी १० दिवसांची तुट कालगणनेत येत असते. ही तुट भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी एक अधिक मास जो ३० दिवसांचा असतो, तो मोजण्यात येतो. त्यालाच अधिक मास म्हणतात. या अधिक मासामुळे कालगणनेचे संतुलन कायम राहते. यामुळेच आज १९३५ वर्षानंतर सुद्धा ग्रेगोरीअन आणि शके यांच्यात बरोबर ७८ वर्षांचे अंतर कायम आहे. अशा प्रकारची तूट भरून काढण्याची कुठलीही तरतूद ही हिजरी कालगणनेत नाही. म्हणून हिजरी सातत्याने ग्रेगोरीअनला जवळ करीत आहे. येत्या काळात हिजरी कालगणना ग्रेगोरीयनला मागे टाकून पुढे जाईल असे तज्ज्ञ सांगतात. यावर्षी अधिक मास असून तो यंदा भाद्रपद महिन्यात येणार आहे.

--(सौजन्य : ओंकार देशमुख यांच्या स्मृतीकोशातून!) (ता. क. : हे सर्व अगदीच बरोबर आहे, असा लेखकाचा दावा नसून यावर ज्यांचे-ज्यांचे आक्षेप असतील ते नक्कीच स्वीकारार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रिया/आक्षेपामुळे लेखकाला आपले ज्ञान वृद्धिंगत करण्यास मदत होणार असल्याने ते तुम्ही जरूर व्यक्त करावेत)

No comments:

Post a Comment