Monday, December 20, 2010

Ayushyawar Bolu Kahi आयुष्यावर बोलू काही

तो मला म्हणाला, आयुष्यावर बोलू काही..

मी त्याला विचारलं का ???

बोलायला काहीच उरलं नाही?



तो म्हणाला

आयुष्य इतकं मोठं आहे

बोललं तर पुरं पडणार नाही

मी म्हणाले...

आयुष्य इतकं छोटं आहे

बोलण्या मध्ये कधी संपलं हे सुद्धा कळणार नाही,

आणि म्हणे आयुष्यावर बोलू काही..... |





कसे
जगलो, कसे जगायचे,

सगळेच ह्या वर चर्चा करतात,

तत्वज्ञान शिकवण्यासाठी

सगळे लगेच पुढे येतात,

आयुष्य आपण किती जगलो

हे कोणीच सांगत नाही,

आणि म्हणे.. आयुष्यावर बोलू काही.....|



हे महाग, ते महाग,

महागाईचा नेहमी रट्टा गातात,

महाग झालं सगळं म्हणून

आपली हौस मारून जगतात,

मान्य आहे मला

हे गणित बसत नाही ..,

पण म्हणून हा विषय

बाजूला ठेवून चालत नाही,

आणि म्हणे.. आयुष्यावर बोलू काही.....|



आयुष्यावर
नुसतं बोलणा-यांनो

जगण्यावारही बोला काही,

प्रेमाच्या कविता करणा-यांना

प्रेम कधीच का जमलं नाही ?

जगण्यातला आनंद

कधी कोणी दाखवलाच नाही,

आणि म्हणे.. आयुष्यावर बोलू काही.....|



त्रास, दुःख, गरिबी

ह्या पलीकडे ही.. एक जग आहे,

कथा कवितां मधेच नाही

तर सत्या मध्ये.. सुद्धा आहे,

सगळे ह्यावर लिहितात

सुंदर शब्दांचा प्रयोग करतात,

सुंदर जगायला कोणालाच जमलं नाही

आणि म्हणे.. आयुष्यावर बोलू काही.....|


आयुष्य मिळाले तर फक्त जगा

कसे, कुठे, केव्हा, किती

हा विचार सोडून बघा

आयुष्यावर बोलण्या पेक्षा

त्यावर प्रेम करायला शिका

कधी तरी स्वतः सोबत


दुसर्यांसाठीही जगायला शिका.....|









संध्या
.....




Source = Facebook ( Click here to view profile and full text )




No comments:

Post a Comment