Showing posts with label आयुष्यावर बोलू काही. Show all posts
Showing posts with label आयुष्यावर बोलू काही. Show all posts

Monday, April 30, 2012

Priy Amucha ek maharashtra Desh ha - Maharashtra Geet

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे,
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा

- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

Priy Amucha ek maharashtra Desh ha - Maharashtra Geet



जयोऽस्तु ते

जयोऽस्तु ते जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!
श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!

राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची
स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तूं त्यांची
परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी
स्वतन्त्रते भगवती चांदणी चमचम-लखलखशी

गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतन्त्रते भगवती तूंच जी विलसतसे लाली
तुं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहिं तूंचि
स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची
मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांतीं
स्वतन्त्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती
जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहकारी होती

हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते
तुजसाठि मरण तें जनन
तुजवीण जनन तें मरण
तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण

-विनायक दामोदर सावरकर

Jayostute lyrics in marathi



हे राष्ट्र देवतांचे


हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
-गीतकार
- ग. दि. माडगुळकर
गायक
- राणी वर्मा
संगीतकार
- सी. रामचंद्र
चित्रपट
- घरकुल - 1970

Saturday, April 28, 2012

सुविचार दिग्गजांचे

जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.

- नारायण मूर्ती

यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.

-- विश्‍वनाथन आनंद

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्‍य आहे.** *

-- धीरूभाई अंबानी

पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. *

-- जे. आर. डी. टाटा

फोटोग्राफरच्या एका "क्‍लिक'मुळे जगणे चिरकाल होते.** *

-- रघू राय

चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.*

- बिल गेट्‌स

मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. *

- कल्पना चावला

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.*

-- बराक ओबामा

माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.

-- आयझॅक न्यूटन

मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे.

-- सर्वपल्ली राधाकृष्णन*

Friday, March 2, 2012

Bal Thakare- Raj Thakare Peom बाळासाहेब ठाकरे - राज ठाकरे - एक कविता

पुत्र शोकाने दशरथ गेला,
पुराण तसे सांगत आहे.
... पुतण्या शोकाने काका जावा,
... असे तुलाही का वाटते आहे?
... बांद्र्याच्या अंधार कोठडीत
जीव माझा घुसमटतो आहे,
ये मला घेऊन चल,
मी तुझी वाट पाहतो आहे.
मातोश्रीवरचा निवास कसला,
इथे तर कारावास आहे.
दरवाज्यामध्ये 'संजय' आणि
खिडकीमध्ये 'मिलिंद' आहे.
डोके आपटावे भिंतीवर
डोक्यात विचारांचे थैमान आहे,
पण इथे तेही शक्य नाही,
भिंतीलाही 'नील्हम'चे कान आहेत.
आयुष्यभर मी एकाच रंगाची
शाल पांघरून बसलो आहे,
तू मात्र चौरंगी ढाल
लिलया पेलतो आहेस.
आयुष्याच्या उताराला वाटायचे थोडा आराम आहे,
पण काय करू अशक्य परी,
व्यासपीठाच्या पाय-या अजून चढतो आहे.
एकच स्वप्न उराशी मरताना
माय मराठी सत्ता पाहणे आहे.
माझी पताका नाही तर नाही,
तुझा तरी झेंडा विधानसभेवर पाहणे आहे.
दु:ख होईल मनाला थोडे,
पण सुखही त्यात तेवढेच आहे.
पूर्ण जरी नसला तरी,
तुलनेने जरा जास्तच त्यात 'भगवा' आहे.
कालदेखील व्यासपीठावर मुखात,
तुझेच नाव चारदा आले.
तुला कुणी बोललेले खपत नाही
म्हणूनच 'लखोबाचे' पुन्हा बारसे झाले.
मातोश्री वरचा बाळ 'राज'
'कृष्ण कुंज' वर 'वाढतो' आहे.
मराठी अस्मिता आज तुझ्यात
उद्याचा बाळासाहेब पाहत आहे..
उद्याचा बाळासाहेब पाहत आहे.....!!
-email forward from Aniket Deshmukh

Wednesday, December 28, 2011

National anthem that make you cry

The Silent Indian National anthem

We have so much space for State, City, Religion , Cast, Rituals. But we never give a thought about Nation. Never put thoughts about national integrity.

This video make me cry and make me think about Nation, National integrity.



Sunday, December 18, 2011

Parcel Culture पार्सल संस्कृती


आपण जेवत असतानाच कुणी पाहुणा आला की, हातात ताट घेऊन आत पळत जायची पद्धत तेव्हा आली नव्हती. जे आपल्या पानात, ती चटणी-भाकरी चटकन वाढली जायची आणि भूक असो वा नसो, दोन घास मायेचे स्वीकारून अतिथी तृप्त व्हायचा. आता मनात असूनही बदलत्या जीवनशैलीनं आपले आग्रहही समजूतदार झाले; पण आता समजून घ्यायचं म्हणजे नेमकं किती समजून घ्यायचं, हेच समजण्याची पंचाईत झालेय. अशीच पंचाईत माझी अलीकडं झाली.




अनेक दिवसांचा आग्रह आता दूर लोटणं अवघड झाल्यानं शेवटी श्रीकांत अन्‌ मृदुलाला मी कळवलंच ः "येतो येत्या शनिवारी जेवायला.'
त्यांना झालेला आनंद मला फोनवरही जाणवत होता. केवळ आपण एखाद्याकडं "जेवायला येतोय' म्हटल्यावर समोरच्या माणसाला एवढा आनंद होतो, ही गोष्टच केवढी सुखद आहे.

तासभर आधीच गेलो. थोड्या गप्पा होतील; मग सावकाशीनं जेवण. खरं तर जेवण हे केवळ गप्पांसाठीचं निमित्त. एकमेकांचा मैत्रभाव साधणारा एक रुचकर दुवा! पाच-दहा मिनिटं गप्पा झाल्यावर उत्साहानं श्रीकांत म्हणाला, "तुम्हीच सांगा, कुठलं हॉटेल "प्रीफर' कराल? "स्वीकार' गार्डन रेस्टॉरंट आहे, "अतिथी'तलं फूड मस्तच!, "सुरभि'मध्ये कॉंटिनेंटल डिशेस..! चॉईस इज युवर्स! अगदी न संकोचता सांगा...'
संकोचायलाही पुरेसा वेळ नव्हता. जे मला कळत होतं, ते खरं होतं की जे खरं होतं ते मला समजत नव्हतं, कुणास ठाऊक! बागेत फिरायला निघालेला माणूस पाय घसरून तलावात पडावा, तसं काहीसं.


"हे बघा श्रीकांत, तुम्हीच ठरवा.'


"अस्सं कस्सं? तुम्हा आमच्या घरी आलायत नं जेवायला?'


तोच धागा शिताफीनं पकडून मी म्हटलं, "अहो, मग घरीच जेवू या नं. अगदी साधी मुगाच्या डाळीची खिचडीही चालेल; पण घरी जेवू या. घरात जेवायची गंमत वेगळी आहे.'



श्रीकांत-मृदुलाची बोलकी दृष्टभेट टिपायला वेगळ्या कॅमेऱ्याची गरज नव्हती. एकदम स्मार्ट टिचकी वाजवून मृदुला म्हणाली, "वॉव! ही तर बेस्ट आयडिया! घरीच जेवू या. खूप गप्पा होतील. तुम्ही बोलत बसलात की ऐकावंसं वाटतं. बाहेर काय, लगेच उठावं लागतं!'

चला! मी सुटकेचा निःश्‍वास सोडला. खूप आग्रह करून घरी जेवायला बोलावणाऱ्या चाहत्यांच्या घरात मला चक्क "घरचं' जेवायला मिळणार होतं. वेगळ्या हातचं - मनापासूनचं!
ड्रॉवर उघडून मेनूकार्ड काढून तेवढ्यात दोघंही ठरवू लागले : "हे बघ श्री, सुरवातीला हराभरा कबाब असू दे. व्हेज मखनी, रुमाली रोटी, मग पनीर फ्राईड राईस...'

फोनवर ऑर्डर दिली गेली. माझी मुगाची खिचडी मूग गिळून बसली!
श्रीकांत म्हणाला, ""आत्ता अर्ध्या तासात पार्सल येईल. हां, इथल्या "सागर'मधलं फूड बाकी...'
दोघांच्या आतिथ्यात कमतरता नव्हती; पण लिफ्टनं पायउतार होताना मन समाधानानं भरलं नव्हतं. वेळ, प्रवास न्‌ खर्च करून गेलेला माणूस एखाद्याच्या घरी फक्त "पार्सल'चं खाद्य खायला जात नसतो; अगदी साधं; पण ज्यात गृहिणीचं मन मिसळलंय, अशा गोष्टीनं आतिथ्य होतं. अशा मनपरंपरेत वाढलेल्या मला पार्सलपरंपरेशी जुळवून घेताना थकायला होत होतं. एवढा कंटाळा, एवढा औपचारिकपणा असेल तर केवळ पैसे मोजून आतिथ्याचा हव्यास तरी ओढवून घ्यायचा कशाला, या प्रश्‍नाचं उत्तर सापडत नव्हतं. आता कशालाही "व्वा!' म्हणावं तर लगोलग उत्तर येतं - "हे श्रेय माझं नाही. "अन्नपूर्णा'तून आणलंय!'
दिवस "पार्सल'नं सुरू होतो; "पार्सल'नं संपतो. ऑफिसला जाताना निघण्याची तारांबळ म्हणून "चार पोळ्या, 200 ग्रॅम भाजी' पार्सल, तर रात्री घरी जाताना "आता कुठं स्वयंपाकाचा कुटाणा; जातानाच नेऊ या पाव-भाजी पार्सल!'
आजारपण, वार्धक्‍य, एकाकीपण, अचानक, अनपेक्षित आलेले खूप पाहुणे आणि आणखीही काही असे क्षण असतील की जिथं "रेडीमेड पार्सल' आणणं गरजेचं आहे. तिथं ती गोष्ट सुविधा ठरते; पण रग्गड पैसा, भरपूर आळस, लाडावलेलं सुखवस्तूपण, फक्त कंटाळा, चट्टू खाण्याची चटक अशा ठिय्या मारून रुतलेल्या असंख्य घरांतल्या वृत्ती-प्रवृत्तीनं आता नव्या समस्यांची पाळणाघरे सुरू केली आहेत!

घरातलं स्वयंपाकघर म्हणजे फक्त पार्सलचं गोडाऊन झालं तर तिथल्या मुलांचं पालन सुखरूप होईल; पण पोषण मात्र होणार नाही. पालन पदार्थांनी होतं; पोषण भावनांनी! आई-बाबा दोघांचाही ध्यास जेव्हा मिसळतो; तेव्हा ताटातल्या पदार्थांना येणारा सुवास कुठल्याही बिलानं चुकता होणारा नसतो. अगदी घरातलं साधं खिमट लोणचं असेल, फोडणीचा भात असेल, गूळ-चपातीचा लाडू असेल...पदार्थ अगदी साधे! पाच मिनिटांहून वेळ लागणार नाही; पण त्यात एक घर मिसळलेलं असतं. चव त्या घराची असते!

कुणी म्हणेल ः सांगायला काय जातं? हल्लीची मुलं खातात का हे असलं? हल्ली चायनीज हक्का नूडल्सवर हक्कानं ताव मारणारी मुलं आहेत. तुमचं सांगणं कालबाह्य आहे! मजा म्हणून खाण्याचे पदार्थ हेच जर रोजचे खाण्याचे झाले तर घर न्‌ हॉटेल यात वेगळेपण काय उरलं? आणि अन्नपदार्थांतलं सत्त्व फक्त चवीत असतं? की त्याच्या पोषणमूल्यांत? एकत्र मायेनं गुंफून साधं-सात्त्विक जेवण्यात? आता गंमत म्हणून, फॉर अ चेंज म्हणून "घरी' जेवू या, असं म्हणणारी घरं वाढत आहेत. सगळेच काही इतके गर्क नाहीत; पण बटण दाबल्यावर सुख दारात हजर, हा आभास नको त्या दिशेनं घेऊन चालला आहे. अनेक लोक हे ऐकण्याच्याही मनःस्थितीत नाहीत; इतकी रेडीमेड सुखाची सवय पटकन्‌ बेफाम वेगानं वाढत आहे. या सर्व सोईंनी वेळ वाचतो, हे खरंच आहे; पण त्या वाचलेल्या वेळेचं काय करायचं, हे स्वतःपुरतं ठरवायला हवं.

जाहिरातीतले स्टार्च इस्त्रीतले पप्पा-मम्मा न्‌ घरातले आई-बाबा यातला फरक अधोरेखित होतो, छोट्या छोट्या गोष्टींतील आपल्या गुंतवणुकीतून. एखाद्‌ वेळची "सोय' जर "कायमची व्यवस्था' होत असेल तर नातीही पार्सलचीच ठरतील! त्याला फक्त लेबल्स असतील; पण त्यात तिन्हीसांजेच्या आठवणींची ऊर्मी नसेल.

आज जी आळशी, सुखवस्तू घरं पार्सलसंस्कृतीच्या पायावर उभी आहेत, त्यांच्या हाती पार्सलनंच पुष्पगुच्छ येणार! पार्सलनंच केक येणार आणि हॅप्पी बर्थ डेचं एक स्वतःची सहीसुद्धा नसलेलं ग्रीटिंग! त्या वेळी जरा वळून पाहताना, आपण आपलं वात्सल्यही पार्सलनंच पाठवलं होतं, या वस्तुस्थितीची जाणीव असायला हरकत नाही. कृती स्वीकारायची ती परिणामासकट!

आधुनिकता, व्यग्रता कितीही असो; नाती एकमेकांशी वा समाजाशी जोडताना थोडी तोशीस पडतेच. प्रसंगी अडचण, चिडचीड, वैतागही उद्भवतोच. तारांबळ-गोंधळ-श्रमही होतात; पण घर नावाच्या समाजात न्‌ समाज नावाच्या घरात एकमेकांना गुंफताना अनेकदा इतकी सावध अलिप्तता नाही चालत. सिमेंटची अलिप्तता घराच्या पायरीसाठी ठीक; पण सिमेंटमध्ये बीज रुजणार नाही. पहिल्या पावसानं टणक ढेकूळ विरल्यावर त्याची मऊ माती होते. पुढं तेच मातीचं मऊपण बीजांकुरांनी हिरवळून येतं. अनेकदा आयुष्यातही रुक्ष अलिप्तता सोडावीच लागते; नाती एकमेकांत दरवळताना एकमेकांसाठी राबायची तयारी लागते.

आजच्या यंत्रयुगाला विसाव्याचे क्षण परवडणारे नाहीत; हे सगळ्यांनाच कळतं; पण तरीही ओढीनं जमवलेले विसाव्याचे क्षण पुन्हा यंत्राच्या स्वाधीन करणं हे केव्हाही समर्थनीय नाही. एकमेकांतील निरपेक्ष सहजता ओसरली तर "शब्द'सुद्धा "पार्सल'मधून आल्यासारखे उमटतील; पण प्रकटणार नाहीत.
श्रीकांत न्‌ मृदुलानं ओढीनं जे अगत्य केलं, ते त्यांच्या माहिती व तंत्रयुगाच्या संदर्भांना धरून अगदी योग्यच आहे; पण त्या हद्दीपलीकडं भावनांचाही एक सुकोमल प्रदेश असतो. जिथं "मन' व्यक्त करताना मनाचाच आधार घेतला की, एक अपार आनंद असतो, हेही त्यांना समजायला हवं!
दोघांनी खूप सारे पैसे खर्च करून "पार्सल'ने घरचं अगत्य केलं; पण त्याहीपेक्षा घरातला साधा "माझ्यासाठी' केलेला चहा मला अधिक उबदार वाटला असता!



Wednesday, October 12, 2011

Anand - Pravin Davane.pdf

Anand - Pravin Davane.pdf


श्री. प्रवीण अनंत दवणे

A Article By Pravin Dawane in Daily news paper Loksatta. Very useful article for parents.


Anand - Pravin Davane

Friday, May 6, 2011

Tari mi mhanato - Mala Majha Job Awadat nahi


Tari mi mhanato - Mala Majha Job Awadat nahi





तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.



रणरणत्या उन्हाच, कधी पावसाच
तुंबलेल्या पाण्यात काम कधी केल नाही ...
भुकेल्या पोटी , बिन चहाच
काम कधी जमलच नाही..

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

रोजच्या प्रवासात कार तर कधी ५० हजाराची बाईक,
रस्त्यांनी हातगाडी आणि सायकली सुद्धा पाहिल्या नाहीत ..
त्यांच्या पेक्षा सुखी म्हणून स्वतःचा मान सुद्धा मी ठेवला नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

पाच आकडी पगार आणि बँकेत पाच-पाच अकाउंट
पण पाच रुपयाचा साधा वडापाव भुकेल्याला दिला नाही.
ए.सी.मध्ये बसून हॉलिडे प्लानिंग खूप केले, पण
ऐन थंडीत काच उघडून कधी धुक्याला साधा स्पर्श सुद्धा केला नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

बावीस कोटी जॉबलेस अशा धगधगत्या सत्यात
महागाईचा 'म' सुद्धा मला शिवला नाही.
जवळ असलेले प्रेम कधी वाटले नाही ,
कि कोणाचे हसू पाहवले नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

ज्याने हे सर्व दिले, त्याचे रोज आभार सुद्धा साधे मानत नाही .
घराच्या माऊलीची छाया असून गर्व कमी होत नाही.
एकामागून एक शिडी पार करताना मन कुठे धावत होते हेच उमगले नाही.
स्वतः बरोबर,मुलाचा साधा आवडता छंद सुद्धा जोपासता आला नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

आपण काय केले कि त्याने ते पुढे न्यावे?
तिने काय जपावे, जे आपण जोपासले?
मृग नक्षत्र पाहता पाहता ,कधी डोळे दिपले
तरी 'स्व' मला सापडायचा नाही.


Source = Facebook.com http://www.facebook.com/punyalapunechmhanapoonanavhe

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.



तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

रणरणत्या उन्हाच, कधी पावसाच
तुंबलेल्या पाण्यात काम कधी केल नाही ...
भुकेल्या पोटी , बिन चहाच
काम कधी जमलच नाही..

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

रोजच्या प्रवासात कार तर कधी ५० हजाराची बाईक,
रस्त्यांनी हातगाडी आणि सायकली सुद्धा पाहिल्या नाहीत ..
त्यांच्या पेक्षा सुखी म्हणून स्वतःचा मान सुद्धा मी ठेवला नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

पाच आकडी पगार आणि बँकेत पाच-पाच अकाउंट
पण पाच रुपयाचा साधा वडापाव भुकेल्याला दिला नाही.
ए.सी.मध्ये बसून हॉलिडे प्लानिंग खूप केले, पण
ऐन थंडीत काच उघडून कधी धुक्याला साधा स्पर्श सुद्धा केला नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

बावीस कोटी जॉबलेस अशा धगधगत्या सत्यात
महागाईचा 'म' सुद्धा मला शिवला नाही.
जवळ असलेले प्रेम कधी वाटले नाही ,
कि कोणाचे हसू पाहवले नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

ज्याने हे सर्व दिले, त्याचे रोज आभार सुद्धा साधे मानत नाही .
घराच्या माऊलीची छाया असून गर्व कमी होत नाही.
एकामागून एक शिडी पार करताना मन कुठे धावत होते हेच उमगले नाही.
स्वतः बरोबर,मुलाचा साधा आवडता छंद सुद्धा जोपासता आला नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

आपण काय केले कि त्याने ते पुढे न्यावे?
तिने काय जपावे, जे आपण जोपासले?
मृग नक्षत्र पाहता पाहता ,कधी डोळे दिपले
तरी 'स्व' मला सापडायचा नाही.


Wednesday, April 27, 2011

Jara chukiche jara barobar जरा चुकीचे जरा बरोबर





जरा चुकीचे... जरा बरोबर......
जरा चुकीचे, जरा बरोबर , बोलू काही.....
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही......


उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ..
उगाच वळसेे शब्दांचे हे देत रहा तू ....
भीडले नाहीत डोळे तोवर , बोलू काही......
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........


तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ..
तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ....
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ;आयुष्या वर बोलू काही..........



हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ..
हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ....
नको-नको से हळवे कातर, बोलू काही.......
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

"उदया-उदया" ची कीती काळजी , बघ रांगेतुन..
"उदया-उदया "ची कीती काळजी , बघ रांगेतुन....
"परवा" आहे "उदया"च नंतर, बोलू काही........
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........



श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी..
श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी....
वाट आंधळी, प्र्वास खडतर ,बोलू काही .......
चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........

चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........

Monday, December 20, 2010

Ayushyawar Bolu Kahi आयुष्यावर बोलू काही

तो मला म्हणाला, आयुष्यावर बोलू काही..

मी त्याला विचारलं का ???

बोलायला काहीच उरलं नाही?



तो म्हणाला

आयुष्य इतकं मोठं आहे

बोललं तर पुरं पडणार नाही

मी म्हणाले...

आयुष्य इतकं छोटं आहे

बोलण्या मध्ये कधी संपलं हे सुद्धा कळणार नाही,

आणि म्हणे आयुष्यावर बोलू काही..... |





कसे
जगलो, कसे जगायचे,

सगळेच ह्या वर चर्चा करतात,

तत्वज्ञान शिकवण्यासाठी

सगळे लगेच पुढे येतात,

आयुष्य आपण किती जगलो

हे कोणीच सांगत नाही,

आणि म्हणे.. आयुष्यावर बोलू काही.....|



हे महाग, ते महाग,

महागाईचा नेहमी रट्टा गातात,

महाग झालं सगळं म्हणून

आपली हौस मारून जगतात,

मान्य आहे मला

हे गणित बसत नाही ..,

पण म्हणून हा विषय

बाजूला ठेवून चालत नाही,

आणि म्हणे.. आयुष्यावर बोलू काही.....|



आयुष्यावर
नुसतं बोलणा-यांनो

जगण्यावारही बोला काही,

प्रेमाच्या कविता करणा-यांना

प्रेम कधीच का जमलं नाही ?

जगण्यातला आनंद

कधी कोणी दाखवलाच नाही,

आणि म्हणे.. आयुष्यावर बोलू काही.....|



त्रास, दुःख, गरिबी

ह्या पलीकडे ही.. एक जग आहे,

कथा कवितां मधेच नाही

तर सत्या मध्ये.. सुद्धा आहे,

सगळे ह्यावर लिहितात

सुंदर शब्दांचा प्रयोग करतात,

सुंदर जगायला कोणालाच जमलं नाही

आणि म्हणे.. आयुष्यावर बोलू काही.....|


आयुष्य मिळाले तर फक्त जगा

कसे, कुठे, केव्हा, किती

हा विचार सोडून बघा

आयुष्यावर बोलण्या पेक्षा

त्यावर प्रेम करायला शिका

कधी तरी स्वतः सोबत


दुसर्यांसाठीही जगायला शिका.....|









संध्या
.....




Source = Facebook ( Click here to view profile and full text )




Tuesday, August 17, 2010

Divas Ase ki - Diwas Ase Lyrics दिवस असे की

दिवस असे की कोणी माझा नाही
अन् मी कुणाचा नाही…

आकाशाच्या छत्रीखाली भिजतो
आयुष्यावर हसणे थुंकून देतो
या हसण्याचे कारण उमगत नाही
या हसणे म्हणवत नाही
दिवस असे की…

प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे
त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे
या घोड्याला लगाम शोधीत आहे
परि मजला गवसत नाही
दिवस असे की…

मी तुसडा की मी भगवा बैरागी
मद्यपि वा मी गांजेवाला जोगी
अस्तित्वाला हजार नावे देतो
परि नाव ठेववत नाही
दिवस असे की…

‘मम’ म्हणताना आता हसतो थोडे
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे
या जगण्याला स्वप्नांcआही आता
मेघ पालवत नाही

दिवस असे की कोणी माझा नाही
अन् मी कुणाचा नाही…








Lyrics Divas Ase ki

Saturday, June 12, 2010

Lyrics Sandip Khare

Praytekachi Ratra Sandip Khare Salil Kulkarni Lyrics प्रत्येकाची रात्र

Ayshywar Bolu Kahi



प्रत्येकाची रात्र प्रत्येकाची रात्र थोडी
आतूनआतून वेड़ी




प्रत्येकाच्या, पायामधे एक तरी बेडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी



प्रत्येकाच्या मनातून कुठला तरी राग
प्रत्येकाच्या चंद्रावर कसला तरी डाग



प्रत्येकाच्या, मनातून काहीतरी खोडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी

प्रत्येकाच्या मनामधे स्वप्नातला देश
प्रत्येकाच्या तळव्याला नशिबाची रेष
प्रत्येकाच्या, प्रत्येकाची छाती करी रोज तडजोड़ी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी

फिटावित जरतारी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी
प्रत्येकाच्या, पानी कशी रोज खाडाखोडी
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी

संदीप खरे, सलील कुलकर्णी
- आयुष्यावर बोलू काही