२०१० ह्या वर्षाचा फार मोठा वाटा आहे भारताच्या प्रगती मध्ये ...
कारण ह्या वर्षात उघड्कीस आलेले प्रकरणे...
सुरवात होते !
२ जी स्पेक्ट्रम घोटाळा !!! . १ लाख ७६ हजार कोटी चे नुकसान..
2 जी म्हणजे - मोबाईल फोन साठी वापरण्यात येणाऱ्या लहरी ची दुसरी पिढी. ह्याची नैसर्गिक मालकी सरकाची असते. ह्या लहरीचे विक्री आणि विक्री साठी ठरवलेली किंमत ह्या मुळे घोटाळ्याची सुरवात झाली. शिवाय ही विक्री ठराविक कंपन्यान मिळावे म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले.
आणि पुढे घोटाळा वाढत गेला.
कॉमनवेल्थचा घोटाळा - खेळांपेक्षा घोटाळेच जास्त गाजले.
सोप्या शब्दात सांगायचे तर अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये सामान विकत घेतले गेले. साधे उदाहरण द्यायचे तर
टोयलेट पेपर चा रोल ४ हजार रुपयांना विकत घेतला ...
एका छत्रीचे भाडे ६ हजार रुपये.
आणि खेळा संदर्भात सर्व स्तरावर घोटाळे सापडले.
प्रक्षेपण, जाहिरात विभाग, मार्केटिंग...
कॉमन वेल्थ चा वेल्दी उपभोग घेतला गेलाय :)
गृह कर्ज घोटाळा
बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब National बँक ह्या बँकामधील कर्मचाऱ्यांनी मिळून एका Money Matter नावाच्या दलाली करणाऱ्या कंपनी शी हातमिळवणी करून अनेकांना उद्योगसमूहांना गृहकर्ज दिले
मेडीकल कौन्सिल घोटाळा.
देशातल्या सर्व मेडिकल कोलेज वर लक्ष ठेवणारी संस्था. IMA Indian Medical Association.
केतन देसाई - प्रमुख.
कॉलेज ला मान्यता मिळावी म्हणून लाच घेत होता.
शिवाय MBBS आणि PG च्या प्रत्येक जागे साठी १ ते १.५ कोटी लाच घेतली जात होती.
IPL घोटाळा
आर्दश सोसायटी घोटाळा
संरक्षण खात्याच्या जमिनीवर मोठ्या लोकांची सोसायटी. अशोक चव्हाण च्या सत्तेला सुरुंग लावणारा घोटाळा
कर्नाटकी भूखंडा घोटाळा
येडी उर्रापा मुख्यामात्रानी केले सरकारी भूखंडाचे वाटप स्वताच्या नातेवाईकांना.
उत्तर प्रदेश खादाडी घोटाळा -- २ लक्ष कोटी रुपयांचा हा घोटाळा असेलं असे काहीचे मत आहे
सार्वजनिक वितरणासाठी ठेवण्यात आलेले धान्य बांगलादेश आणि नेपाळ देशांना विकले गेले
मुंबई मधील रेल्वे भारती घोटाळा.
प्रश्नपत्रिका एक दिवस आधी मिळवून त्याची विक्री
२०१० ने हे स्पष्ट केले आहे की देशाला मुख्य मंत्री पदाच्या खुर्चीवर काम करण्यासाठी श्री.नरेन्द्र मोदी आणि श्री.नितिशकुमार यांच्यासारखे 'सीईओ' हवेत.
गौरवास्पद क्षण क्रीडा क्षेत्र
१) भारतीय संघ टेस्ट क्रिकेट च्या रंकिंग मधेय अग्रस्थानी आहे
२) विश्वनाथ आनंद ने त्याच्या तल्लख बुद्धीने पुन्हा एकदा भारताचे नाव उंचावले.
३) कॉमन वेल्थ मधेय भारताने १०१ पदके पटकावली.... (38 सुवर्ण पदक, 27 रजत , 36 कास्य )
4) सायना नेहवाल ने होंग-कोंग सुपर मालिका मधेय कमाल केली .. अप्रतिम विजय प्राप्त केला. जागतिक क्रमवारीत ती आता दुसऱ्या क्रमाकावर आहे
५) तेंडल्या (सचिन तेंडूलकर ... राग मानू नये आम्ही लाडाने म्हणतो लहानपणापासून ) एकदिवसीय सामान्य मधेय द्विशतक झळकावले ...
ह्या शिवाय काही आठवते आहे का ? असेल तर नक्की कळवा !
'ब्राम्होस' हे अतिवेगवान (सुपरसॉनिक) क्षेपणास्त्र भारतीय नौदलाने सरळ उभ्या रेषेत यशस्वीपणे डागले. या चाचणीमुळे उभे आणि आडवे
अशा दोन्ही पद्धतीने डागले जाणारे 'ब्राम्होस' हे जगातले एकमेव क्षेपणास्त्र ठरले आहे. २९० किलोमीटर्सवरील लक्ष्याचा भेद करण्याची त्याची क्षमता असून 'आयएनएस राजदूत' या युद्धनौकेवरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3858668.cms)
संदर्भ गुगल सर्च !!
http://ibnlokmat.tv/
http://www.exposeknowledge.com/
No comments:
Post a Comment