Saturday, February 19, 2011

ICC WORLD CUP 2011 India Vs Bangladesh India वीरेंद्र सेहवाग ने काढला वचपा !

वीरेंद्र सेहवाग

आज वीरेंद्र सेहवाग ने विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या चेंडूवर ... चेडू सीमारेषेच्या बाहेर हाकलला !!

तेव्हाच विरेन्द्राच्या धावांच्या पावसाचा गडगडत सुरु झाला होता !!



२००७ मधे बंल्गादेश संघाने भारतीय संघाला धूळ चारली होती ! त्याच्याच बदला / वचपा आज काढला असे वाटते आहे !

एक गोष्ट मात्र नक्की आहे बांगलादेश च्या संघात चांगलीच सुधारणा आहे ! भारताच्या धावांचा डोंगर मोठा असल्यामुळे आपले निभावले.

आपले क्षेत्ररक्षण म्हणजे .. चेंडू च्या आधी चेंडूच्या मागे धावणारा खेळाडू सीमारेषेच्या बाहेर !!!
पण ती पद्धत फार छान आहे ! चांगलाच मार लागत असेल खेळाडूना !

हा सामना पूर्ण पणे एकतर्फ्री होता. परंतु बंल्गादेश ची सरासरी पाहिल्यास पुसटसे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते !

विराट कोहली
विराट कोहली ने सुद्धा शतक मारले. भारतची पहिले फलंदाजी होती.. हा डाव संपण्याच्या जवळ होता वीरेंद्र बाद झाला होता ...आणि डाव संपण्याच्या आधी विराट चे शतक होते की नाही ही धाकधूक लागून होती..
त्याचे शतक पाहण्यात छान मज्जा आली

49.5 ह्या चेंडूवर त्याने स्वताचे शतक झळकावले ! :)

हे त्याचे पाचवे शतक आहे !












स्कोर कार्ड इथे पहावे
कॉमेंट्री इथे पहावी


Source ESPN !

No comments:

Post a Comment