Friday, March 19, 2010

Jasa Atut naat asata Paus ani Chatriche जसं अतूट नातं असतं पा‌ऊस आणि छत्रीचं

जसं अतूट नातं असतं
पा‌ऊस आणि छत्रीचं,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

अंगरख्याच्या आत असतं
मुलायम अस्तर जरीचं,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

जसं हळुवार बंधन असतं
श्रावणाशी सरीचं,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

जसं नातं लाटांचं
किनाऱ्याशी खात्रीचं,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

No comments:

Post a Comment