जस्स च्या तस्स.............!!!!!!!
जस्स च्या तस्स राहील का सारं....?
हाक नुसती ऐकून थांबेल का वारं.......??
धपाट्याबरोबर मिळतील का आईच्या हातचे पोहे
रीझल्टवरच्या सहीसह बाबांचा प्रश्न ....काय हे?
सहलीच्या आदल्या दिवशी उडालेली झोप,
आजीबरोबर लावलेले पहिले-वहिले रोप,
ती दिड रुपया भाड्याची सायकल,
ब्रेकडांस व मूनवॉक करनारा तो मायकल...
पुन्हा खांद्यावर दिसेल का ती शाळेची बॅग....?
अणि मानेला रुतेल का नव्या शर्टचा टॅग....?
आवडती छ्त्री हरवेल का परत..?
मोडतील का बेत आल्यावर ठरत..?
शाळेतली मैत्रीण परत मारेल का हाक..?
मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक...?
ऐन सुट्टीत हरवेल का पत्त्यांचा कॅट..?
आउट झालो कारण चांगली नव्हती बॅट..?
होईल का टिव्ही - "ब्लॅक ऍन्ड व्हाईट" चा "कलर"..?
पाहिल्यावर एकदम चोरेल का ती नजर...??
"Ice-cream" ची टिंग-टिंग ऐकून पळतील का पोरं...?
मधल्या सुट्टीत खायला मिळतील का बोरं..?
जस्स च्या तस्स राहील का सारं....?
हाक नुसती ऐकून थांबेल का वारं..?
>>>>>>>>>>>>>>>>!<<<<<<<<<<<<<<<<<<<< जस्स च्या तस्स काहि राहत नाही, थांबवायला गेलो वारं तर वादळ आल्याशिवाय राहत नाहि. धपाटा मारण्यासाठी का होईना पण वाटत की, आई जवळ हवी होती, अणि दरवाज्यातल्या मोटारी पेक्शा जुनी सायकलच बरी होती, आदिदास असो वा रामदास असो आजीच्या हातच्या लोणच्यापुढे, सार काही दास आहे त्याचीच आठवण येऊन आज मन मात्र उदास आहे आठवणीच्या ह्या सावल्यांकडे मी आजकाल पाहत नाही, थांबवायला गेलो वारं तर वादळ आल्याशिवाय राहत नाहि. पुर्वि छ्त्री हरवली होती, आता छत्र ही हरवलं आहे, प्रियेसिला लिहीलेलं पहिलंवहिलं पत्र हि हरवलं आहे, पावसाच्या प्रत्येक थेंबाप्रमाणे, तीची छबी नवी होती, नजर चुकवण्यासाठी का होईना..... पण ती जवळ हवी होती. एरवी मुसळधार पावसात चिंब भिजणारा मी आज पावसाच्या वाटेलाही जात नाही...... थांबवायला गेलो वारं तर वादळ आल्याशिवाय राहत नाहि
No comments:
Post a Comment