आजही अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांना "आयपीएल' हा प्रकार नक्की काय आहे, त्यातील गुंतागुंतीचे आर्थिकव्यवहार कसे आहेत, याची पुरेशी कल्पना नाही.
शशी थरूर आणि "आयपीएल' प्रकरण सुरू झाले, तेव्हा पंतप्रधान मनमोहनसिंग हे परदेशात म्हणजे अमेरिकेतहोते.
हे प्रकरण फारच रंगू लागल्यानंतर म्हणजेच त्यांच्यापर्यंत ते पोचल्यानंतर त्यांनी अखेर एका सहायकास
विचारले, "व्हॉट एक्झॅक्टली धिस आयपीएल इज?' हा विशेष सहायक काहीसा फटकळ होता. त्याने,
"धिस इज द फॉलआउट ऑफ इकनॉमिक रिफॉर्म्स विच यू स्टार्टेड इन १९९१' असे उत्तर दिले आणि मग अर्थातचत्याने गांभीर्याने "आयपीएल' प्रकार काय आहे, हे सांगितले.
राजधानीतील ही एक चर्चित ऐकीव कहाणी आहे.
अशा कहाण्यांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करायचा नसतो, त्याचा मथितार्थ ध्यानात घ्यायचा असतो. मनमोहनसिंगयांना क्रिकेटमध्ये रस असेल, यावर कोणाचा फारसा विश्वास बसणार नाही.
ते बऱ्याच अंशी खरेही आहे.
त्यामुळे क्रिकेटच्या या घोळाची त्यांनी माहिती कशी घेतली असावी, खरोखरच त्यांना "आयपीएल'बद्दल काहीमाहिती नसावी काय, असे प्रश्न आणि कुतूहल पत्रकारांच्या मनात होते.
त्या संदर्भात पंतप्रधान कार्यालयातील काही व्यक्तींकडे मुद्दाम चौकशीही केली.
त्या लोकांच्या सांगण्यानुसार पंतप्रधान अगदीच अनभिज्ञ नाहीत.
त्यांची नातवंडे आणि कुटुंबातील काही तरुण मंडळी क्रिकेटचे सामने पाहतात, घरातही काही क्रिकेटविषयक गप्पाहोतात. त्यामुळे ते पूर्णपणे अज्ञानी आहेत, असे म्हणता येणार नाही. ,
त्यांना फारशी कल्पना नसणे स्वाभाविक आहे.
Post a Comment
पुढचे पान
Source = http://www.esakal.com/
No comments:
Post a Comment