गव्हाचा चिवडा
साहित्य- भिजवलेले गहू २ वाट्या, १ वाटी लसूण, मिरच्या २-३ ह्याची पेस्ट किंवा तुकडे करा. धने जिरे पूड, बडीशोप भाजून, बेदाणे, तिखट, मीठ, हळद खसखस भाजून, आमसूल पावडर, तेलाची मोहरी हिंग व कढीपत्ता ह्याची फोडणी
कृती - प्रथम गहू ६ तास पाण्यात भिजवा. नंतर उपसून कापडावर टाकून कोरडे करा व तेलात गहू पोहे किंवा डाळ तळतो तसे तळा. कागदावर तळून टाका. म्हणजे तेल राहात नाही नंतर तेलाची मोहरी, हिंगाची फोडणी करून त्यात कढीपत्ता बारीक चिरलेला लसूण मिरच्या, तिखट टाकून खरपूस भाजा. नंतर भाजलेली खसखस, धनेपूड, जिरेपूड, मीठ, हळद, आमसूल पावडर, बेदाणे, तळलेले गहू टाकून चांगला मिसळा. आवश्यकता असल्यास सजावटीसाठी व चवीसाठी कोथिंबीर टाका.
___________________________________________________________________
तांदळाचा गुजराती चिवडा
साहित्य - तळण्यास भरपूर तेल, चांगले तांदूळ, काबूली चणे, वाटाणा, दाणे, हिरवे मूग, बेदाणे, खोबर्याचा कीस, दाण्याचा कूट, तिखट मीठ, थोडी हळद, तीळ २ चमचे, कढीपत्ता, तळलेले काजू, कोथींबीर, मिरच्या, हिंग.
कृती - प्रथम तांदुळ धुवून वाळवून कोरडे झाल्यावर भरपूर तेलात मंदाग्नीवर तळा. मुरमुर्यासारखे फुगतात. नंतर क्रमाक्रमाने काबुली हरभरे, वाटाणे, थोडे दाणे, काजू, हिरवे मूग तळा. २ चमचे तेलात तीळ परता. तेलाची फोडणी करून त्यात हिंग मिरच्या, कढीपत्ता, तिखट टाकून परता व शेवटी तळलेले साहित्य, मीठ, दाण्याचा कूट थोडी हळद, तीळ व कोथींबीर टाकून सर्व मिसळा. गुजराती लोकात हा चिवडा प्रसिद्ध आहे.
No comments:
Post a Comment