Saturday, October 9, 2010

dharani maay धरणी माय

A small Poem Dedicated to Our earth Form the movie Huppa Huyya ( Marathi)
हुप्प हुय्या चित्रपटतील
बबन्या ने सदर केलेली छोटीशी कविता विचार करायला लावते

______________________________________________________________________




धरणी माय चे रडणे दुखणे समजून घे मेरे भाय !!
नुसताच म्हणतो धरणी माय आणि तिच्या साठी करतो काय ?

दिसेल ती जमीन कसून घेतो, रस समदा शोषून घेतो,
माय मरूदे!! माय मरूदे! फायद्याची समद्यांना झाली घाय !!
नुसताच म्हणतो धरणी माय अन तिच्या साठी करतो काय?

कारखान्याच्य काला चीम्नीतून धूर भसा भसा !!
वरती समदा पेटत चाललाय खालून पाण्याचा उपसा !!
वर्ष मधले १२ महिने कडक उन्हाळा जाय !!
नुसताच म्हणतो धरणी माय आणि तिच्या साठी करतो काय ?

ग्लोबल वार्मिंग वाले म्हनत्यात (ग्लोबल वार्मिंग म्हणजे पृथ्वीचे वाढत चाललेले तापमान )

हळू s s s s हळू s s s s जरा धारा धीर
आम्हाला काहीच ऐकू येत नाही कान आमचे बधीर

अरे तापत चालले धरणीचे डोक छाती पोट आणि पाय
नुसताच म्हणतो धरणी माय आणि तीच्य साठी करतोस काय

असाच चालू रहिले तर आपली काही खैर नाय
उद्या चालू आपला पोरग विचारलं हिरवळ म्हणजी काय


अर् उठ अर् उठ वाचाव आपल्या आईला झटकून हात पाय

नुसताच म्हणतो धरणी माय आणि तीच्य साठी करतोस काय
___________________________________________________________________


काय काय बारा करता येईल !!!

मी एक यादी बनवणार आहे आणि ती तयार झाली कि पाठवतो !!

आपले काही मार्गदर्शन असेल तर कळवा
हुप्प हुय्या ची लिंक ---- हि इथे




No comments:

Post a Comment