Wednesday, June 9, 2010

Marathi PJ अत्यंत भयानक पी जे

अतीभयानक पीजे
------------------------
दोन छोटी मुलं बोलत उभी असतात.
पहिला: माझी आई सर्व्हिस करते...
दुसरा: माझी आई टेनीस खेळत नाही...
----------------------






पाल आणि मिथुन यांच्यात फरक काय?
.....
......
......
.....
मिथुन 'चक्रवरती'
आणि
पाल 'भिंतीवरती'
----------------------









शंकर भगवान: भक्त, मी तुझ्या तपस्येने खुष झालो आहे, बोल काय पाहिजे?
भक्त: महादेवा, मला डी.जे. सिस्टीम हवी आहे..
शंकर भगवान: अरे मूर्खा!! डीजे सिस्टीम असती तर मी डमरू का वाजवला असता?
------------------------















एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात तर एक मग दुसर्या मगाला काय म्हणेल?
उत्तर: काय मग काय चाल्लय?
------------------------







मास्तर: बंड्या 'रस असणे' वाक्यात उपयोग करुन दाखव...
बंड्या: उसाचा रस काढणार्या माणसाला उसाचा रस काढण्यामधे फार रस होता....!!
------------------------











दोन झुरळे ICU मध्ये एकमेकांच्या शेजारी ॅडमीट असतात...
.झु.: काय 'बेगॉन' का...?
दु.झु.: नाही रे ... 'पॅरॅगॉन'..!!
------------------------
अलीबाबा गुहा शोधायला चालत निघतो,
चालुन चालुन खुपच दमतो,
चालता चालता
शेवटी एकदाची गुहा येते.
तर तो काय म्हणेल?
.
.
.
.
आली बाबा !!
------------------------





लालु पी.एम. बनतो. गावात फेमस व्हायला म्हशींबरोबर फोटो काढतो. दुसर्या दिवशी पेपर मधे फ्रंट पेज वर तोफोटो येतो. खाली लिहिलेले असते, लालू, डावीकडुन तिसरा!!
------------------------





जेव्हा सिंहाची गर्जना होते तेव्हा काय होते ?????
.
.
.
.
अरे
टॉम अँड जेरी सुरु होते ...
------------------------







एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात.
रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार.."
तर त्या मांजरी काय म्हणतील???
"माऊ माऊ"!!
------------------------







गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्लिश मधे म्हणुन दाखव बघु....
"70, 82, 89, 99"
बबन: "शेवंती, येती तू ?... येत नाय? .. नाय नाय!!!"
-----------------------






पहिला मुलगा: माझे बाबा एव्हढे उंच आहेत की ते चालत्या विमानाला हात लावतात ....
दुसरा मुलगा: माझे बाबा पण खुप उंच आहेत पण ते असला मूर्खपणा करत नाहीत ....
-----------------------







मुंगी भारी की आपण भारी?
उत्तरः मुंगी भारी..
कारण, मुंगी आपल्या चावू शकते, पण आपण मुंगीच्या चावू शकत नाही..
-----------------------






जर बसंतीची मावशी ठाकूरला राखी बांधते तर बसंती आणि ठाकूर मधे नातं काय?
.
.
.
.
.
अरे विचार काय करताय? ठाकूरला हातच नव्हते
-------------------------














चंद्रावर पाणी सापडले आहे!!!
.
.
.
.
.
ग्लास, चकना आणि खंबा घेउन लवकर या ...
--------------------------













शिवाजी महाराजांनी त्यांच्या किल्ल्यांचा काय उपयोग केला??
.
.
.
राज्य करण्यासाठी??
.
.
नाही ..
.
.
विचार करा..
.
.
सोप्पय...
.
.
कुलुप उघडण्यासाठी !!
---------------------
















मुंग्या असतात. त्यांना एक केक दिसतो.
पहिली मुंगी जाते आणि केक खायला चालु करते..
ते पाहुन दुसरी मुंगी पण जाते आणि केक खाते..
पण तिसरी मुंगी जाउन केक खात नाही... का??
?
?
कारण, ती म्हणते, "शी, केक ला मुंग्या लागल्यात ...!!"











मराठी कुटुंबाची मध्यप्रदेशात बदली झाली. शेजारणीने
मराठी बाईला विचारले, "दोपहरको क्या करती हो?"
मराठी बाईने उत्तर
दिले, "थोडा गिरती हूँ!"..."क्या?" "हा हमारे यहा पे सब लोग दोपहरको
थोडा थोडा गिरते है...







COmments Taka :)
‍‍‍‍

No comments:

Post a Comment