Saturday, July 10, 2010
शिवाजी महाराजांवर इंग्रजी सिनेमा
छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली, मालिका निघाल्या, मराठी सिनेमे
आले. पण याजाणत्या राजाचे महत्त्व उभ्या जगाला कळावे यासाठी आता इंग्रजी सिनेमा येणार आहे. महत्वाकांक्षी कलादिग्दर्शकनितीन देसाई हा भव्यदिव्य प्रकल्प वास्तवात आणणार आहेत.
एखाद्या साहसी हॉलिवूडपटाप्रमाणे यात चित्रीकरण करण्यात येणार असून त्यासाठी कोट्यवधींचे बजेट आखण्यातआल्याचे कळते.
त्यासाठी हॉलीवूडमधून विशेष तंत्रज्ञानांना बोलावण्यात येणार आहे. येत्या २४ तारखेला ' राजाशिवछत्रपती ' या मालिकेच्या डीव्हीडी प्रकाशन सोहळ्यात या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येईल.
या सिनेमासाठी आवश्यक तेथे भव्यदिव्य सेट उभारण्यात येईलच. पण या सेट्सप्रमाणे महाराजांच्या कर्तृत्त्वाची साक्ष देणारे किल्ल्यांवर या सिनेमाची चित्रीकरण करण्याची देसाई यांची मनिषा आहे. त्यासाठी ते सरकार आणि पुरातत्त्व खात्याची परवानगीही घेणार आहेत.
' राजा शिवछत्रपती ' या मालिकेत महाराजांची भूमिका गाजवणारे डॉ. अमोल कोल्हेच या सिनेमात महाराजांची भूमिका करतील. तर चित्रपटांच्या लेखनप्रक्रियेत कवी गुलजार यांचा सहभाग असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment