पाणी वाचवा !
हो तहान लागली आहे आता आपण विहीर खोदकाम सुरु करू
पुणे तिथे काय उणे !
आहे आहे सध्या इथे काही तरी उणे आहे इथे पाणी ३०- ५० % उणे झाले आहे.
आमचे जुने ऑफिस आधी एका सध्या इंटरनेट कॅफे मध्ये होते ( साधी कंपनी आमची. साधी राहाणी आणि उच्च
विचारसरणी )
आमच्या ऑफिस मधेय पाणी बॉटल मधे भरून आणून पिले जात होते. पाणी आम्ही शेजारच्या होटेल मधून आणायचो.
थोडे दिवस त्यांनी दिले पाणी पण नंतर हटकले
भिकाऱ्याला जसे हटकतात तसे (उच्च विचारसरणी )
मागच्या वर्षी हीच वेळ आली होती पण थोद्द्क्यात निभावले.
आम्ही मराठवाड्यातले मागासलेले! कमी पाण्यात राहणारे ! ( इथे आल्यावर कळले ) त्यामुळे आम्हाला भरपूर उपाय माहित आहे पाणी वाचवायचे.
( असेल तुमचे उपाय तुमचे उपाय तुमच्या कडे आमचे उपया आम्ही बघू :) )
अहो पेठे मधे सुधा पाणी नाही हो कसे होणार पुणेकरांचे !
माझ्या आईंने शिकवलेले काही उपाय आहेत खालील प्रमाणे
पाणी वाचवा
सगळ्यात पहिले तर तुमच्या कडे साठवण करण्यासाठी पुरेसे भांडे हवेत.
बादल्या ३, मोठ्ठे हंडे ३ , पीप २ , २ माठ , छोटेखाणी ड्रम. आणि २ छोट्या किवा मोठ्या काल्श्या (नसेल काळत तर
साथिया मधले गाणे आठवावे (छलका!!!!! छलका रे कलसे का ) )
पुण्या मधेय साठवण हा प्रकार नाही !! त्यामुळे खरा त्रास आहे.
"अहो आज रात्री पाणी आलेच नाही" ... (पाणी कॅन्डल लाइट डिनर ला गेले असेल दुसरीकडे )
हार्ड डिस्क वर जागा हवी नवीन चित्रपट कॉपी करून ठेवायचा असेल तर...
तर उपाय असे ....
बेसिन चा नळाचा फोर्से जेवढा गरजेचा आहे तेवढाच ठेवला गेला पाहिजे किवा निदान वापरण्याला तेवधी अक्कल हवी कि
किती सोडावे.
नवरे (पुरुष ) लोकांनी दाढी करताना बेसिनमध्ये नळ चालू करून बृश फिरवत बसू नये.
ब्रश जर अंघोळ करताना केला तर छान त्यामुळे २ फायदे १ तर पाणी पण वाचते आणि उगीच घाणरडे थोबाड घेऊन TV समोर, Gallery Madhey उगीच फिरून प्रदर्शन करणे बंद होईल.
अंघोळ करताना एका बदलीत (३०-४० लिटर) अंघोळ होते.
थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय असेल तर अजून छान कारण गरम पाणी म्हटले कि सगळे लहान बाळ होतात बाथरूम
मध्ये अजून एक तांब्या घ्यावा असे वाटल्याशिवाय राहत नाही.
शोवर काढून टाकता येणार नाही. पण त्या खाली अंघोळ करणे कधीतरी ठीक आहे ! किवा दररोज जरी म्हटले तर बदली +
शोवर असा मेळ घातला तर उत्तम
२ वेळेस अंघोळ !!! हा हा हा .. मह्झ्या आईं ने बाहेरून आले कि हात पाय धुणे हि सवय लावून टाकली आहे त्यामुळे आम्ही
दर वेळेस सेमी अंघोळ करत असतो ...आणि त्यामुळे पाणी वाचते कि
भाज्या धुवून झालेल्या पाण्याचे काय करायचे ! कुंडीत टाका किवा सांडपाण्याच्या बादलीत टाकून ठेवा येत जाता तेच पाणी
सांडपाणी म्हणून वापरता येते. पाय धुण्यासाठी वापरता येईल. फरशी पण पुसता येईल की
तरुण मंडळी ची दिल कि धडक्क्क्न म्हणजे बाईक किवा कार १.४ महिन्यात एकदा धुवा आणि आळशी असाल तर जावूद्या
आणखी बचत! वाशिंग सेंटर आहेच की! ओल्या फडक्याने पुसुक काढले तरी Pulsor चमकते किवा स्विफ्ट पण
चमकते.
पाण्याचा प्याला तोंडाला लावला न की TOP TO Bottom Marayacha ९० ml सारखा. जास्तीचे पाणी पिले
तर काहीच नुकसान होत नाही.
पाणी वरून पिले तर धुवायची गरज नाही पडत. प्याला धुण्यासाठी पिलेल्या पाण्याच्या १/४ पाणी लागते.
अति स्वच्छता जपणारे मंडळी असतील तर ते अजून जास्त पाणी वापरतात.
भांडे भिजत घालून ठेवले तर ते लवकर निघतात आणि त्यामुळे पाणी कमीच लागते असेच कपड्यांचे पण
सडा टाकायचा असेल तर आधी तेवढे पाणी गोळा झाले पाहिजे होटेल मालकांनी गिऱ्हाईकाची उरलेलं पाणी जमिनीवर जर
मारले तर जमीन किवा रस्ता किवा फारशी उष्टी नाही होत.
(तसे हि इकडच्या अति चिकट लोकांना पाण्या साठीचा चिटकपण| सुद्धा शिकवावा लागतो म्हणजे .... दुर्दैव). माझी
आज्जी सांगत असायची अरे माठ्या बाथरूम मधेय का ओतलेस ते पाणी झाडांना टाक रे ! !!
रात्री झोपताना सगळे दार बंद आहेत एक ह्याची खात्री करता करता जर सगळे नळ बंद आहेत त्याची खात्री झाली तर उत्तम
काही थेंब वाचतील
नळ आला की जुने पाणी (१ दिवस जुने ) टाकून दिले जाते त्याऐवजी ते दुसऱ्या बाकी गोष्टीन् साठी वापरले जाते.
पाणी वाया गालावाण्यात फ्लश चा फार मोठा हात आहे.
फ्लश ची टाकी साधारण ३ ltr ची असावी.
आमच्या होस्टेल वरच्या नॉन पुणेरी बांधवाना पन चांगली सवय आहे कपडे धुवून उरलेले पाणी संडासाच्या बदलीत टाकून
देतात म्हणजे आपोआप साफ सफाई होवून जाते किवा गाडी वर टाकून देतात नंतर फक्त गाडी वर फडका मारला कि झाले.
मी घरी असताना मी आणि आई हौद धुवूत असायचो ठेवाह हौदातले पाणी आम्ही अंगणात कुंडया, झाडे आणि गाडी वर
टाकायचो.
आई आणि मी कधी कधी पाणी भरायचो तेह्वा एक भांडे भरत असताना दुसरे रिकामे भांडे जवळच असायचे.
पाणी आहे अजून गेले नाही म्हणून आम्ही कधी मोठा पाईप लावून गल्लीभर पाणी मारत नाही बसलो सरळ बंद करून
टाकायचो.
पुढे वडिलांनी अजून एक छोटा हौद बांधून घेतला. गाई म्हशी पाखरे कुत्रे मांजरी त्या पाण्यात तहान भागवतात.
*सार्वजनिक ठिकाणी नळ वाहत असतील तर आपण स्वत:जाऊन ते बंद करावेत. पण पुणेरी कधी पाणउतारा करतील सांगता येत नाही म्हणून this is not a practical thing.
एक रंजक बातमी पाणी ह्या विषयावर येथे दिसेल
माझ्या वडलांनी अजून एक गम्मत केली आहे ! गच्चीवरून येणारे पाणी सरळ एका हौदात सोडले आहे पान त्या पाईप मधेय जाळी लावून घेतली आहे त्यामुळे ते तसे बऱ्यापैकी स्वछच असते.
वरील सगळ्या गोष्टी आपण स्वत करू शकतो त्यामुळे सरकार काय करेल आणि पाण्यचे तानकर वाहताना पाहून त्याला शिकवला जाण्याच्या ऐवजी पहिले हे शिकले तर बरे होईल .
No comments:
Post a Comment