कवीतेचे शीर्षक आहे - पुणेरी अजगर
एक गरुड पाहिला परवा भुकेलेला, दमून गेला होता उडून
अजगर दिसला त्याला, पडला होता आख्खा ससा गट्टम करून
क्षणार्धात झेपावला तिकडे, ’ चला जेवणाची सोय झाली’ म्हणून
उचलला चोचीत त्या महासर्पाला आणि मार्गी झाला रस्ता काढत गगनातून
कळलच नाही अजगराला आत्ता होतो झाडाच्या सावलीत आणि आत्ता आलो कुठे
एकदम त्याला द्रुश्य दिसले, आभाळातून जमिनीचे
लगेचच अजगर उदगारले - " आता नाही राहिले जंगल पुर्वीचे" !
- अर्जुन देशपांडे
No comments:
Post a Comment