Wednesday, March 2, 2011
Lallati BHandar Jogwa Lyrics जोगवा !!!! लल्लाटी भंडार !!
नदीच्या पल्याड, आईचा डोंगर
डोंगर माथ्याला, देवीचं मंदिर
घालू जागर जागर, डोंगर माथ्याला
लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रंगून, डोंगर येण्गुन, उघड देवी दार
नदीच्या पानावर, आन्गीन फुटतं,
तुझ्या नजरेच्या तालावर, काळीज डुलत,
नाद आला गं आला, जीवाच्या घुंगराला,
लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रंगून, डोंगर येण्गुन, उघड देवी दार
नवसाला पाव तू, हाकेला धाव तू,
देवी माझ्या राहावं तू, काम क्रोध अर्पूनी लाव तू,
काम क्रोध मर्दुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू
डोळा भरून, तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगाऱ्या वाहीन
घुगाऱ्या वाहीन, तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रंगून, डोंगर येण्गुन, उघड देवी दार
यल्लमा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर ही डावाती गं, जमल्या गं लेकरं
पुनवेचा चांदवा देवीचा, देवीचा मायेचा पाझर
आईच्या मायेचा पाझर, सागर ह्यो भक्तीचा सागर
खणा नारळान तुझी, ओटी मी भरीन
ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझं देव्हारा धरीन
देव्हारा धरीन, माझी ओंजळ भरीन
आई सांभाळ सांभाळ, कुशीत लेकराला
आई सांभाळ सांभाळ, कुशीत लेकराला
लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रंगून, डोंगर येण्गुन, उघड देवी दार
यल्लमा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर ही डावाती गं, जमल्या गं लेकरं
पुनवेचा चांदवा देवीचा, देवीचा मायेचा पाझर
आईच्या मायेचा पाझर, सागर ह्यो भक्तीचा सागर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment