Friday, March 11, 2011

क्रिकेट विरुद्ध प्रेयसी Cricket Vs Girlfriend


१) पुढचा सर्व महिनाभर मी फक्त माझ्या मित्रांशीच जास्तीत जास्त वेळ बोलेन. त्यांच्या घरी मॅच पहायला जाईन किवा त्यांना माझ्या घरी बोलवेन. त्यामुळे तुला माझ्यासाठी वेळच नाही अशी भुणभुण करायची नाही. केल्यास दुर्लक्ष केले जाईल.

२) माझा फोनही याकाळात बिझी असेल. तेव्हा फोन घेतला नाही म्हणून सतत करायचा नाही. एसएमएस पाठवायचे नाहीत. इग्नोरच केले जातील. फोन बिझी असला तर मी क्रिकेटवर चर्चा करतोय असे समजून गप्प बसायचे.

३) याकाळात मी तुला भेटेनच असे नाही. मॅच बुडवून तुला भेटायला येण्याचे कष्ट मी घेणार नाही. पण तरी समजा, एखाद्या दिवशी मी भेटलोच, आलोच एखाद्या मॅचच्या दिवशी आणि नाही फार बोललो तर त्याचे भलतेसलते अर्थ काढायचे नाहीत. तुझे माझ्यावर प्रेमच नाही, तू दुसरीकडे कुठं अडकलास का, तू का असा वागतोस माझ्याशी?, अशी भंकस करायची नाही. मी काहीही ऐकून न घेता निघून जाईन आणि मग वर्ल्डकप संपेपर्यंत भेटणार नाही.

४) भेटणे, जेवायला जाणे, पार्ट्या, तुझ्या मैत्रिणींचे वाढदिवस असे सगळे कार्यक्रम रहित करण्यात येतील. कुठल्याही प्रकारचा आग्रह करण्यात येऊ नये.

५) एक महत्वाचं – तुला क्रिकेटमधलं काहीही कळत नाही, असं सांगण्याची वेळ माझ्यावर आणायची नाही. “आज कोणाची मॅचे…?” असं लाडात येऊन विचारल्यास आपलं ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. किमान रोजचा पेपर वाचायचा, किमान भारताची मॅच कधी आहे हे पहायचं. आणि प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत.

६) मुलींना फारसं क्रिकेट कळत नाही हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे उगीच आपल्याला फार कळतं, अशा अविर्भावात माझ्याशी चर्चा करायला यायचं नाही. चर्चा केली जाईल, पण तेव्हा मी जे काही सांगतोय ते केवळ भक्तीभावानं ऐकून घ्यायचं. क्रिकेटविषयी क्रिकेट सोडून बोलायला तू काही मंदिरा बेदी नाहीस हे लक्षात ठेवायचं.

७) मी मॅच पाहत असताना फोन करुन ‘रोमॅण्टिक’ गप्पा मारण्याचा प्रयत्नही करायचा नाही. मॅचमधला रोमॅण्टिसिझम मला पुरतो.

८) सचिन तेंडुलकर कितीही आवडत असला तरी “ए, सचिन मारेल का आज सेंच्युरी…?” असले बावळट प्रश्न विचारायचे नाहीत. बावळट यासाठी की तेव्हा सचिन नाही तर सेहवाग किंवा युसुफच क्रिझवर असतो. उगीच 'स्मार्ट'नेस दाखवायचा नाही.


९) प्रेमापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं असतं, हे तू लक्षात ठेव. त्यामुळे “तूला माझ्यापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं वाटतं का…?” असा प्रश्न विचारायचा नाही. मी होकारार्थी उत्तर दिल्यास परिणामांना मी जबाबदार राहणार नाही.

१०) सगळ्यात महत्वाचं – हे सगळे नियम पाळले गेल्यास आणि माझ्या मनाप्रमाणे सगळ्या मॅचेसचे निकाल लागत गेल्यास मी कधीमधी एखादा फोन करीन (आणि ते ही थोडावेळच).





Girlfriend to her Boyfriend

जर ह्या mail चे reply त्या मुलाच्या girlfriend ने दिले तर ती कशी देईल???

एक नमुना :

तशी मला तुला उत्तर लिहायची अजिबात इच्छा नाहीये पण तुलाही समजू देत कि मी काय विचार करते ते. OK, let’s come to the point. तुझ्यासारखे रामायण लिहायला माझ्याकडे वेळ नाही. क्रिकेट संपल्यावर भारत जिंकला म्हणून party करायला त्या सचिन, सेहवाग किंवा युसुफ कडेच जा. माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नसणार आहे, हे लक्षात ठेव आणि चुकून भारत हरला तर माझ्याकडे रडत यायची गरज नाही. मंदिरा कडे गेलास तरी माझी हरकत नाही. तुझ्या आयुष्याला पुरेल एवढे प्रेम तू तुझ्या त्या फडतूस क्रिकेट वर कर आणि वेळ वाया घालवणाऱ्या त्या क्रिकेट सोबतच लग्न कर. उगाच माझी अपेक्षा ठेवू नकोस. कारण मी मनुष्यप्राणी आहे रोबोट नाही – वेळीच play & pause व्हायला...

एक महत्वाचे – तुला जर वाटत असेल कि जगात तू एकटाच मुलगा राहिला आहेस तर तू चुकीचा विचार करतोयस... खरं तर ८०० मुली मागे १००० मुल फिरताहेत, हे लक्षात ठेव. ;)

जास्त समजावून सांगण्यात मी वेळ वाया घालवत नाही कारण तुला तेवढी समज नाहीच... चुकून क्रिकेट तेवढे कळते. नवल आहे...!!



एक सूचना: ह्या कथेतील सगळे पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा कुठल्याही घटनेशी किंवा व्यक्तीशी काहीही संबंध नाही. असल्यास तो एक योगायोग समजावा.

No comments:

Post a Comment