Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts

Monday, April 30, 2012

Priy Amucha ek maharashtra Desh ha - Maharashtra Geet

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे,
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा

- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

Priy Amucha ek maharashtra Desh ha - Maharashtra Geet



जयोऽस्तु ते

जयोऽस्तु ते जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!
श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!

राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची
स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तूं त्यांची
परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी
स्वतन्त्रते भगवती चांदणी चमचम-लखलखशी

गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतन्त्रते भगवती तूंच जी विलसतसे लाली
तुं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहिं तूंचि
स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची
मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांतीं
स्वतन्त्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती
जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहकारी होती

हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते
तुजसाठि मरण तें जनन
तुजवीण जनन तें मरण
तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण

-विनायक दामोदर सावरकर

Jayostute lyrics in marathi



हे राष्ट्र देवतांचे


हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
-गीतकार
- ग. दि. माडगुळकर
गायक
- राणी वर्मा
संगीतकार
- सी. रामचंद्र
चित्रपट
- घरकुल - 1970

Sunday, January 15, 2012

Wake Up Voters-मराठी मतदार माणूस जागा हो !! मतदार राजा जागा हो !!!

Wake Up Voters-मराठी मतदार माणूस जागा हो !! मतदार राजा जागा हो !!!


Well Known Marathi Actor Dr. Shriram Lagu's words about current Temptations for voters.



Monday, November 7, 2011

Janlokpal Bill by Expert Marathi

Janlokpal Draft/ Bill by Expert Marathi



जणलोकपाल मराठी मधेय

JAN_LOKPAL Bill by Expert (Marathi)

Wednesday, May 4, 2011

Parcel Culture : Parcle Sanskruti :पार्सल संस्कृती प्रवीण दवणे Pravin Dawane



Pravin Dawane
पार्सल संस्कृती सकाळ पेपर मधला रविवारचा लेख
-इ मेल फोरवर्ड



आपण जेवत असतानाच कुणी पाहुणा आला की, हातात ताट घेऊन आत पळत जायची पद्धत तेव्हा आली नव्हती. जे आपल्या पानात, ती चटणी-भाकरी चटकन वाढली जायची आणि भूक असो वा नसो, दोन घास मायेचे स्वीकारून अतिथी तृप्त व्हायचा. आता मनात असूनही बदलत्या जीवनशैलीनं आपले आग्रहही समजूतदार झाले; पण आता समजून घ्यायचं म्हणजे नेमकं किती समजून घ्यायचं, हेच समजण्याची पंचाईत झालेय. अशीच पंचाईत माझी अलीकडं झाली.


अनेक दिवसांचा आग्रह आता दूर लोटणं अवघड झाल्यानं शेवटी श्रीकांत अन्‌ मृदुलाला मी कळवलंच ः "येतो येत्या शनिवारी जेवायला.'
त्यांना झालेला आनंद मला फोनवरही जाणवत होता. केवळ आपण एखाद्याकडं "जेवायला येतोय' म्हटल्यावर समोरच्या माणसाला एवढा आनंद होतो, ही गोष्टच केवढी सुखद आहे.



तासभर आधीच गेलो. थोड्या गप्पा होतील; मग सावकाशीनं जेवण. खरं तर जेवण हे केवळ गप्पांसाठीचं निमित्त. एकमेकांचा मैत्रभाव साधणारा एक रुचकर दुवा! पाच-दहा मिनिटं गप्पा झाल्यावर उत्साहानं श्रीकांत म्हणाला, "तुम्हीच सांगा, कुठलं हॉटेल "प्रीफर' कराल? "स्वीकार' गार्डन रेस्टॉरंट आहे, "अतिथी'तलं फूड मस्तच!, "सुरभि'मध्ये कॉंटिनेंटल डिशेस..! चॉईस इज युवर्स! अगदी न संकोचता सांगा...'
संकोचायलाही पुरेसा वेळ नव्हता. जे मला कळत होतं, ते खरं होतं की जे खरं होतं ते मला समजत नव्हतं, कुणास ठाऊक! बागेत फिरायला निघालेला माणूस पाय घसरून तलावात पडावा, तसं काहीसं.
"हे बघा श्रीकांत, तुम्हीच ठरवा.'
"अस्सं कस्सं? तुम्हा आमच्या घरी आलायत नं जेवायला?'
तोच धागा शिताफीनं पकडून मी म्हटलं, "अहो, मग घरीच जेवू या नं. अगदी साधी मुगाच्या डाळीची खिचडीही चालेल; पण घरी जेवू या. घरात जेवायची गंमत वेगळी आहे.'



श्रीकांत-मृदुलाची बोलकी दृष्टभेट टिपायला वेगळ्या कॅमेऱ्याची गरज नव्हती. एकदम स्मार्ट टिचकी वाजवून मृदुला म्हणाली, "वॉव! ही तर बेस्ट आयडिया! घरीच जेवू या. खूप गप्पा होतील. तुम्ही बोलत बसलात की ऐकावंसं वाटतं. बाहेर काय, लगेच उठावं लागतं!'



चला! मी सुटकेचा निःश्‍वास सोडला. खूप आग्रह करून घरी जेवायला बोलावणाऱ्या चाहत्यांच्या घरात मला चक्क "घरचं' जेवायला मिळणार होतं. वेगळ्या हातचं - मनापासूनचं!
ड्रॉवर उघडून मेनूकार्ड काढून तेवढ्यात दोघंही ठरवू लागले : "हे बघ श्री, सुरवातीला हराभरा कबाब असू दे. व्हेज मखनी, रुमाली रोटी, मग पनीर फ्राईड राईस...'



फोनवर ऑर्डर दिली गेली. माझी मुगाची खिचडी मूग गिळून बसली!
श्रीकांत म्हणाला, ""आत्ता अर्ध्या तासात पार्सल येईल. हां, इथल्या "सागर'मधलं फूड बाकी...'
दोघांच्या आतिथ्यात कमतरता नव्हती; पण लिफ्टनं पायउतार होताना मन समाधानानं भरलं नव्हतं. वेळ, प्रवास न्‌ खर्च करून गेलेला माणूस एखाद्याच्या घरी फक्त "पार्सल'चं खाद्य खायला जात नसतो; अगदी साधं; पण ज्यात गृहिणीचं मन मिसळलंय, अशा गोष्टीनं आतिथ्य होतं. अशा मनपरंपरेत वाढलेल्या मला पार्सलपरंपरेशी जुळवून घेताना थकायला होत होतं. एवढा कंटाळा, एवढा औपचारिकपणा असेल तर केवळ पैसे मोजून आतिथ्याचा हव्यास तरी ओढवून घ्यायचा कशाला, या प्रश्‍नाचं उत्तर सापडत नव्हतं. आता कशालाही "व्वा!' म्हणावं तर लगोलग उत्तर येतं - "हे श्रेय माझं नाही. "अन्नपूर्णा'तून आणलंय!'


दिवस "पार्सल'नं सुरू होतो; "पार्सल'नं संपतो. ऑफिसला जाताना निघण्याची तारांबळ म्हणून "चार पोळ्या, 200 ग्रॅम भाजी' पार्सल, तर रात्री घरी जाताना "आता कुठं स्वयंपाकाचा कुटाणा; जातानाच नेऊ या पाव-भाजी पार्सल!'
आजारपण, वार्धक्‍य, एकाकीपण, अचानक, अनपेक्षित आलेले खूप पाहुणे आणि आणखीही काही असे क्षण असतील की जिथं "रेडीमेड पार्सल' आणणं गरजेचं आहे. तिथं ती गोष्ट सुविधा ठरते; पण रग्गड पैसा, भरपूर आळस, लाडावलेलं सुखवस्तूपण, फक्त कंटाळा, चट्टू खाण्याची चटक अशा ठिय्या मारून रुतलेल्या असंख्य घरांतल्या वृत्ती-प्रवृत्तीनं आता नव्या समस्यांची पाळणाघरे सुरू केली आहेत!



घरातलं स्वयंपाकघर म्हणजे फक्त पार्सलचं गोडाऊन झालं तर तिथल्या मुलांचं पालन सुखरूप होईल; पण पोषण मात्र होणार नाही. पालन पदार्थांनी होतं; पोषण भावनांनी! आई-बाबा दोघांचाही ध्यास जेव्हा मिसळतो; तेव्हा ताटातल्या पदार्थांना येणारा सुवास कुठल्याही बिलानं चुकता होणारा नसतो. अगदी घरातलं साधं खिमट लोणचं असेल, फोडणीचा भात असेल, गूळ-चपातीचा लाडू असेल...पदार्थ अगदी साधे! पाच मिनिटांहून वेळ लागणार नाही; पण त्यात एक घर मिसळलेलं असतं. चव त्या घराची असते!



कुणी म्हणेल ः सांगायला काय जातं? हल्लीची मुलं खातात का हे असलं? हल्ली चायनीज हक्का नूडल्सवर हक्कानं ताव मारणारी मुलं आहेत. तुमचं सांगणं कालबाह्य आहे! मजा म्हणून खाण्याचे पदार्थ हेच जर रोजचे खाण्याचे झाले तर घर न्‌ हॉटेल यात वेगळेपण काय उरलं? आणि अन्नपदार्थांतलं सत्त्व फक्त चवीत असतं? की त्याच्या पोषणमूल्यांत? एकत्र मायेनं गुंफून साधं-सात्त्विक जेवण्यात? आता गंमत म्हणून, फॉर अ चेंज म्हणून "घरी' जेवू या, असं म्हणणारी घरं वाढत आहेत. सगळेच काही इतके गर्क नाहीत; पण बटण दाबल्यावर सुख दारात हजर, हा आभास नको त्या दिशेनं घेऊन चालला आहे. अनेक लोक हे ऐकण्याच्याही मनःस्थितीत नाहीत; इतकी रेडीमेड सुखाची सवय पटकन्‌ बेफाम वेगानं वाढत आहे. या सर्व सोईंनी वेळ वाचतो, हे खरंच आहे; पण त्या वाचलेल्या वेळेचं काय करायचं, हे स्वतःपुरतं ठरवायला हवं.




जाहिरातीतले स्टार्च इस्त्रीतले पप्पा-मम्मा न्‌ घरातले आई-बाबा यातला फरक अधोरेखित होतो, छोट्या छोट्या गोष्टींतील आपल्या गुंतवणुकीतून. एखाद्‌ वेळची "सोय' जर "कायमची व्यवस्था' होत असेल तर नातीही पार्सलचीच ठरतील! त्याला फक्त लेबल्स असतील; पण त्यात तिन्हीसांजेच्या आठवणींची ऊर्मी नसेल.



आज जी आळशी, सुखवस्तू घरं पार्सलसंस्कृतीच्या पायावर उभी आहेत, त्यांच्या हाती पार्सलनंच पुष्पगुच्छ येणार! पार्सलनंच केक येणार आणि हॅप्पी बर्थ डेचं एक स्वतःची सहीसुद्धा नसलेलं ग्रीटिंग! त्या वेळी जरा वळून पाहताना, आपण आपलं वात्सल्यही पार्सलनंच पाठवलं होतं, या वस्तुस्थितीची जाणीव असायला हरकत नाही. कृती स्वीकारायची ती परिणामासकट!



आधुनिकता, व्यग्रता कितीही असो; नाती एकमेकांशी वा समाजाशी जोडताना थोडी तोशीस पडतेच. प्रसंगी अडचण, चिडचीड, वैतागही उद्भवतोच. तारांबळ-गोंधळ-श्रमही होतात; पण घर नावाच्या समाजात न्‌ समाज नावाच्या घरात एकमेकांना गुंफताना अनेकदा इतकी सावध अलिप्तता नाही चालत. सिमेंटची अलिप्तता घराच्या पायरीसाठी ठीक; पण सिमेंटमध्ये बीज रुजणार नाही. पहिल्या पावसानं टणक ढेकूळ विरल्यावर त्याची मऊ माती होते. पुढं तेच मातीचं मऊपण बीजांकुरांनी हिरवळून येतं. अनेकदा आयुष्यातही रुक्ष अलिप्तता सोडावीच लागते; नाती एकमेकांत दरवळताना एकमेकांसाठी राबायची तयारी लागते.



आजच्या यंत्रयुगाला विसाव्याचे क्षण परवडणारे नाहीत; हे सगळ्यांनाच कळतं; पण तरीही ओढीनं जमवलेले विसाव्याचे क्षण पुन्हा यंत्राच्या स्वाधीन करणं हे केव्हाही समर्थनीय नाही. एकमेकांतील निरपेक्ष सहजता ओसरली तर "शब्द'सुद्धा "पार्सल'मधून आल्यासारखे उमटतील; पण प्रकटणार नाहीत.
श्रीकांत न्‌ मृदुलानं ओढीनं जे अगत्य केलं, ते त्यांच्या माहिती व तंत्रयुगाच्या संदर्भांना धरून अगदी योग्यच आहे; पण त्या हद्दीपलीकडं भावनांचाही एक सुकोमल प्रदेश असतो. जिथं "मन' व्यक्त करताना मनाचाच आधार घेतला की, एक अपार आनंद असतो, हेही त्यांना समजायला हवं!
दोघांनी खूप सारे पैसे खर्च करून "पार्सल'ने घरचं अगत्य केलं; पण त्याहीपेक्षा घरातला साधा "माझ्यासाठी' केलेला चहा मला अधिक उबदार वाटला असता!




Sunday, May 1, 2011

Sant Eknath maharaj संत एकनाथ महाराज



संत एकनाथ महाराज एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (हिरवा मुसलमान) त्यांच्यार थुंकला त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडल नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले. शिक्षकांनी हि गोष्ट वर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….? असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली :

१- नाथ किती महान होते ते कळत

२- नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते

३ - माणसाने कस वागाव ते हि गोष्ट शिकवत

४ - एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका

५ - रागावून त्रास तुम्हालाच

६ - शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वरच

७ - दुसरयाला माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे अशी उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता.


शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत, त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली, ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकीनुसारच दिली पण, नाथांची गोष्ट ऐकल्यावर माझ्या लक्षात आल ते अस,

“कि हिंदू समाज तेव्हा हि निद्रिस्त होता आणि आज हि आहे “. शिक्षक म्हणाले, “काय बोलतोस तू…?, नाथांना चूक ठरवतोस…..?”. तो विद्यार्थी म्हणाला, “ नाही गुरुजी मी नाथांना चूक ठरवणारा कोण….?, नाथ जे काही वागले ते त्यांच्या सन्यस्त वृत्तीला साजेसच होत या कृती मुळे ते संत पदाच्या सर्वोच्च स्थानी बसले पण…?, तो यवन जेव्हा १०८ वेळा थुंकत होता त्यावेळी हिंदू समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या गोष्टीचा विरोध करावा असे मुळीच वाटले नाही नाथ संत असले तर तो हिंदू समाज संत नव्हता, जर वेळीच चोप दिला असता तर तो यवन नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता नाथांनी जस त्याचं काम केल तस हिंदूंनी त्याचं काम करण योग्य होत न कि, नाथांच्या या कृतीचा चुकीचा अर्थ विचार लोकात पसरवण.

हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !!

जय हिंद, जय महाराष्ट्र

!!! II मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र-धर्म वाढवावा II



संत एकनाथ महाराज एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (हिरवा मुसलमान) त्यांच्यार थुंकला त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडल नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले. शिक्षकांनी हि गोष्ट वर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….? असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली :

१- नाथ किती महान होते ते कळत

२- नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते

३ - माणसाने कस वागाव ते हि गोष्ट शिकवत

४ - एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका

५ - रागावून त्रास तुम्हालाच

६ - शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वरच

७ - दुसरयाला माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे अशी उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता.


शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत, त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली, ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकीनुसारच दिली पण, नाथांची गोष्ट ऐकल्यावर माझ्या लक्षात आल ते अस,

“कि हिंदू समाज तेव्हा हि निद्रिस्त होता आणि आज हि आहे “. शिक्षक म्हणाले, “काय बोलतोस तू…?, नाथांना चूक ठरवतोस…..?”. तो विद्यार्थी म्हणाला, “ नाही गुरुजी मी नाथांना चूक ठरवणारा कोण….?, नाथ जे काही वागले ते त्यांच्या सन्यस्त वृत्तीला साजेसच होत या कृती मुळे ते संत पदाच्या सर्वोच्च स्थानी बसले पण…?, तो यवन जेव्हा १०८ वेळा थुंकत होता त्यावेळी हिंदू समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या गोष्टीचा विरोध करावा असे मुळीच वाटले नाही नाथ संत असले तर तो हिंदू समाज संत नव्हता, जर वेळीच चोप दिला असता तर तो यवन नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता नाथांनी जस त्याचं काम केल तस हिंदूंनी त्याचं काम करण योग्य होत न कि, नाथांच्या या कृतीचा चुकीचा अर्थ विचार लोकात पसरवण.

हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !!

जय हिंद, जय महाराष्ट्र

!!! II मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र-धर्म वाढवावा II

Saturday, April 16, 2011

Pune tithe Kay Une (पुणे तिथे काय उणे )


पुणे तिथे काय उणे..हि घ्या यादि.


नमस्कार मित्रांनो. माझ्या ब्लॉग ला दिवसागणिज प्रतिसाद वाढतच चाललाय आणि त्याच प्रमाणे माझे मराठि टंकलेखन हि सुधारु लागलय. सगळी तुमचीच कृपा.


नुकतेच माझ्या गावाकडे चांगली महिनाभर सुट्टि घालवुन आलो आणि साहित्य-संमेलन हि घराशेजारिच भरले होते त्याचा हि आस्वाद घेतला आता आलोय परत.
रेल्वे स्टेशन च्या बाहेर आलो आणि पहिला विचार मनात आला तो म्हणजे च्यायला का परत पुण्याला आलो हा. पुण्यात येण्या अगोदर प्रत्येकाला वाटते मि पुण्याला चाललोकिती छान”. पण सहा एक महिन्यात माणुस येतो लाईनीवर. आणि बर्याच जणांना फ़ोन वर हेच सांगतो..”पुण्यात काय मजा नाही राव, नुसते गाडिंचे आवाज त्या ट्राफ़िक ची कटकट.” ज्याला ट्राफ़िक ची कटकट हि अतिशोयक्ती वाटते त्याने पुण्यात गाडि चालवुनच बघावी.


पुण्यातले रस्ते हा बातम्यांचा विषय होता. खड्यात रस्ता म्हणजे काय हे पाहण्या साठि खास अभ्यास सहली येऊन गेल्या..असे म्हणे बाबा. खास पाठिचे आणि हाडांचे विकार यावर चर्चासत्रे घेउन काहि लोकांनी आपल्या स्वताःच्या म्हातारपणाची तरतुद करुन ठेवली. नुसते पेपर मधुन लेख आणि फ़ोटो येत होते कॉमन-मॅन मात्र ढिम्मं. घेतोय रोज आपलीच .. शेकुन.
पण हां आता परिस्थिती चांगली नसली तरी बरि आहे. लाजे खातर का होइना पण रस्ते केलेत डांबरी. पण आता नविनच टुम निघालीए रस्ते कॉंक्रिटीकरणाची. रस्ते कॉंक्रिट चे करणार आहेत. करा चांगलच आहे पण (च्यायला हापणदर वेळि येतोच) गावातले सगळे रस्ते एकदमच खणायचे? पुण्यात गल्लो-गल्ली तुम्हाला दिसतील ते म्हणजेखुदा हुआ रस्ता और टुटा हुआ दिल’..जाउदे ते दिल वगैर भानगडित आपण आत्ता पडायला नको. आणि आहेत तेहि रस्ते किती पुरतात? नुसत्या एकमेकाला चिकटवुन गाडि चालवायला जमत नाही म्हणुन अंतर ठेवल्या सारखे करायचे. तेपी.एम.टीचे ड्रायवर तर रिटायरमेंट नंतर नक्किच सर्कस मध्ये जाउन त्या लोकांनासर्कशीत गाडि कशी चालवावीहे शिकवत असणार.
बाईक वाले तर अगदि धुम-मचाले-धुम. आणि खास करुनत्याच्यामागे जरतीबसली असेल तर विचारयलाच नको. या जोड्यांचा वेग बघुन हि पळुन जाऊन लग्न वगैर करायच्या बेतात आहेत कि काय अशी शंका मनात उगीचच डोकाउन जाते. सिग्नलचा लाल दिवा तर रिक्शा वाल्यांसाठी थट्टेचाच विषय. रस्त्याच्या कडेला लोके थांबवुन ठेवलेली असतात आणि मंत्र्यांचा ताफ़ा वेगाने निघुन जातो कदाचित हा मंत्रीपणाचा फ़िल मिळवण्यासाठि सगळि लोकं सिग्नलला थांबलेली असताना रिक्शा वाले मात्र आपला ताफ़ा घेउन भुर्रदिशी निघुन जातात. नुसती वाट लागलीए रसत्यांची. मुले, वृद्ध लोके रस्ता ओलांडणार कसा याचा विचार वेळेच्या कमतरते अभावी केला नसाव.


रोज शेकड्याने नविन गाड्या रस्त्यावर येतायत. कारण एकच बस मध्ये जागा नाहि आणि पाहिजेल तेंव्हा पुर्ण बसच नाहि. एकदा डेक्कन-वारजे हि बस संध्याकाळि रस्त्या वरुन जाताना पहावी. हि बस एवढे लोकं घेउन पुढे जाऊ शकते…. हे बघुन बस बनवणार्या टाटांचे हि डोळे पांढरे होतील, हि अवस्था. कोण आपल्या गाड्या सोडुन बसनं जायचा विचार करणार?


घराचे बोलावे तर ........
पुढचे पान
.


पुणे तिथे काय उणे..हि घ्या यादि


पुणे तिथे काय उणे..हि घ्या यादि.


नमस्कार मित्रांनो. माझ्या ब्लॉग ला दिवसागणिज प्रतिसाद वाढतच चाललाय आणि त्याच प्रमाणे माझे मराठि टंकलेखन हि सुधारु लागलय. सगळी तुमचीच कृपा.


नुकतेच माझ्या गावाकडे चांगली महिनाभर सुट्टि घालवुन आलो आणि साहित्य-संमेलन हि घराशेजारिच भरले होते त्याचा हि आस्वाद घेतला आता आलोय परत.
रेल्वे स्टेशन च्या बाहेर आलो आणि पहिला विचार मनात आला तो म्हणजे च्यायला का परत पुण्याला आलो हा. पुण्यात येण्या अगोदर प्रत्येकाला वाटते मि पुण्याला चाललो “किती छान”. पण सहा एक महिन्यात माणुस येतो लाईनीवर. आणि बर्याच जणांना फ़ोन वर हेच सांगतो..”पुण्यात काय मजा नाही राव, नुसते गाडिंचे आवाज त्या ट्राफ़िक ची कटकट.” ज्याला ट्राफ़िक ची कटकट हि अतिशोयक्ती वाटते त्याने पुण्यात गाडि चालवुनच बघावी.


पुण्यातले रस्ते हा बातम्यांचा विषय होता. खड्यात रस्ता म्हणजे काय हे पाहण्या साठि खास अभ्यास सहली येऊन गेल्या..असे म्हणे बाबा. खास पाठिचे आणि हाडांचे विकार यावर चर्चासत्रे घेउन काहि लोकांनी आपल्या स्वताःच्या म्हातारपणाची तरतुद करुन ठेवली. नुसते पेपर मधुन लेख आणि फ़ोटो येत होते कॉमन-मॅन मात्र ढिम्मं. घेतोय रोज आपलीच .. शेकुन.
पण हां आता परिस्थिती चांगली नसली तरी बरि आहे. लाजे खातर का होइना पण रस्ते केलेत डांबरी. पण आता नविनच टुम निघालीए रस्ते कॉंक्रिटीकरणाची. रस्ते कॉंक्रिट चे करणार आहेत. करा चांगलच आहे पण (च्यायला हा ’पण’ दर वेळि येतोच) गावातले सगळे रस्ते एकदमच खणायचे? पुण्यात गल्लो-गल्ली तुम्हाला दिसतील ते म्हणजे ’खुदा हुआ रस्ता और टुटा हुआ दिल’..जाउदे ते दिल वगैर भानगडित आपण आत्ता पडायला नको. आणि आहेत तेहि रस्ते किती पुरतात? नुसत्या एकमेकाला चिकटवुन गाडि चालवायला जमत नाही म्हणुन अंतर ठेवल्या सारखे करायचे. ते ’पी.एम.टी’ चे ड्रायवर तर रिटायरमेंट नंतर नक्किच सर्कस मध्ये जाउन त्या लोकांना ’सर्कशीत गाडि कशी चालवावी’ हे शिकवत असणार.
बाईक वाले तर अगदि धुम-मचाले-धुम. आणि खास करुन ’त्याच्या’ मागे जर ’ती’ बसली असेल तर विचारयलाच नको. या जोड्यांचा वेग बघुन हि पळुन जाऊन लग्न वगैर करायच्या बेतात आहेत कि काय अशी शंका मनात उगीचच डोकाउन जाते. सिग्नलचा लाल दिवा तर रिक्शा वाल्यांसाठी थट्टेचाच विषय. रस्त्याच्या कडेला लोके थांबवुन ठेवलेली असतात आणि मंत्र्यांचा ताफ़ा वेगाने निघुन जातो कदाचित हा मंत्रीपणाचा फ़िल मिळवण्यासाठि सगळि लोकं सिग्नलला थांबलेली असताना रिक्शा वाले मात्र आपला ताफ़ा घेउन भुर्रदिशी निघुन जातात. नुसती वाट लागलीए रसत्यांची. मुले, वृद्ध लोके रस्ता ओलांडणार कसा याचा विचार वेळेच्या कमतरते अभावी केला नसाव.


रोज शेकड्याने नविन गाड्या रस्त्यावर येतायत. कारण एकच बस मध्ये जागा नाहि आणि पाहिजेल तेंव्हा पुर्ण बसच नाहि. एकदा डेक्कन-वारजे हि बस संध्याकाळि रस्त्या वरुन जाताना पहावी. हि बस एवढे लोकं घेउन पुढे जाऊ शकते…. हे बघुन बस बनवणार्या टाटांचे हि डोळे पांढरे होतील, हि अवस्था. कोण आपल्या गाड्या सोडुन बसनं जायचा विचार करणार?


घराचे बोलावे तर ........
पुढचे पान
.


Wednesday, March 2, 2011

Lallati BHandar Jogwa Lyrics जोगवा !!!! लल्लाटी भंडार !!


नदीच्या पल्याड, आईचा डोंगर
डोंगर माथ्याला, देवीचं मंदिर
घालू जागर जागर, डोंगर माथ्याला

लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रंगून, डोंगर येण्गुन, उघड देवी दार

नदीच्या पानावर, आन्गीन फुटतं,
तुझ्या नजरेच्या तालावर, काळीज डुलत,
नाद आला गं आला, जीवाच्या घुंगराला,

लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रंगून, डोंगर येण्गुन, उघड देवी दार

नवसाला पाव तू, हाकेला धाव तू,
देवी माझ्या राहावं तू, काम क्रोध अर्पूनी लाव तू,
काम क्रोध मर्दुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू

डोळा भरून, तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगाऱ्या वाहीन
घुगाऱ्या वाहीन, तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला

लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रंगून, डोंगर येण्गुन, उघड देवी दार

यल्लमा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर ही डावाती गं, जमल्या गं लेकरं
पुनवेचा चांदवा देवीचा, देवीचा मायेचा पाझर
आईच्या मायेचा पाझर, सागर ह्यो भक्तीचा सागर

खणा नारळान तुझी, ओटी मी भरीन
ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझं देव्हारा धरीन
देव्हारा धरीन, माझी ओंजळ भरीन

आई सांभाळ सांभाळ, कुशीत लेकराला
आई सांभाळ सांभाळ, कुशीत लेकराला

लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रंगून, डोंगर येण्गुन, उघड देवी दार
यल्लमा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर ही डावाती गं, जमल्या गं लेकरं
पुनवेचा चांदवा देवीचा, देवीचा मायेचा पाझर
आईच्या मायेचा पाझर, सागर ह्यो भक्तीचा सागर

Friday, July 23, 2010

Save Water ! Paani Wachawa पाणी वाचवा साधे उपाय !

पाणी वाचवा !
हो तहान लागली आहे आता आपण विहीर खोदकाम सुरु करू


पुणे तिथे काय उणे !
आहे आहे सध्या इथे काही तरी उणे आहे इथे पाणी ३०- ५० % उणे झाले आहे.

आमचे जुने ऑफिस आधी एका सध्या इंटरनेट कॅफे मध्ये होते ( साधी कंपनी आमची. साधी राहाणी आणि उच्च

विचारसरणी )
आमच्या ऑफिस मधेय पाणी बॉटल मधे भरून आणून पिले जात होते. पाणी आम्ही शेजारच्या होटेल मधून आणायचो.
थोडे दिवस त्यांनी दिले पाणी पण नंतर हटकले
भिकाऱ्याला जसे हटकतात तसे (उच्च विचारसरणी )

मागच्या वर्षी हीच वेळ आली होती पण थोद्द्क्यात निभावले.
आम्ही मराठवाड्यातले मागासलेले! कमी पाण्यात राहणारे ! ( इथे आल्यावर कळले ) त्यामुळे आम्हाला भरपूर उपाय माहित आहे पाणी वाचवायचे.

( असेल तुमचे उपाय तुमचे उपाय तुमच्या कडे आमचे उपया आम्ही बघू :) )

अहो पेठे मधे सुधा पाणी नाही हो कसे होणार पुणेकरांचे !


माझ्या आईंने शिकवलेले काही उपाय आहेत खालील प्रमाणे

पाणी वाचवा

सगळ्यात पहिले तर तुमच्या कडे साठवण करण्यासाठी पुरेसे भांडे हवेत.
बादल्या ३, मोठ्ठे हंडे ३ , पीप २ , २ माठ , छोटेखाणी ड्रम. आणि २ छोट्या किवा मोठ्या काल्श्या (नसेल काळत तर
साथिया मधले गाणे आठवावे (छलका!!!!! छलका रे कलसे का ) )

पुण्या मधेय साठवण हा प्रकार नाही !! त्यामुळे खरा त्रास आहे.
"अहो आज रात्री पाणी आलेच नाही" ... (पाणी कॅन्डल लाइट डिनर ला गेले असेल दुसरीकडे )
हार्ड डिस्क वर जागा हवी नवीन चित्रपट कॉपी करून ठेवायचा असेल तर...

तर उपाय असे ....

बेसिन चा नळाचा फोर्से जेवढा गरजेचा आहे तेवढाच ठेवला गेला पाहिजे किवा निदान वापरण्याला तेवधी अक्कल हवी कि

किती सोडावे.

नवरे (पुरुष ) लोकांनी दाढी करताना बेसिनमध्ये नळ चालू करून बृश फिरवत बसू नये.
ब्रश जर अंघोळ करताना केला तर छान त्यामुळे २ फायदे १ तर पाणी पण वाचते आणि उगीच घाणरडे थोबाड घेऊन TV समोर, Gallery Madhey उगीच फिरून प्रदर्शन करणे बंद होईल.


अंघोळ करताना एका बदलीत (३०-४० लिटर) अंघोळ होते.
थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय असेल तर अजून छान कारण गरम पाणी म्हटले कि सगळे लहान बाळ होतात बाथरूम

मध्ये अजून एक तांब्या घ्यावा असे वाटल्याशिवाय राहत नाही.

शोवर काढून टाकता येणार नाही. पण त्या खाली अंघोळ करणे कधीतरी ठीक आहे ! किवा दररोज जरी म्हटले तर बदली +

शोवर असा मेळ घातला तर उत्तम

२ वेळेस अंघोळ !!! हा हा हा .. मह्झ्या आईं ने बाहेरून आले कि हात पाय धुणे हि सवय लावून टाकली आहे त्यामुळे आम्ही

दर वेळेस सेमी अंघोळ करत असतो ...आणि त्यामुळे पाणी वाचते कि

भाज्या धुवून झालेल्या पाण्याचे काय करायचे ! कुंडीत टाका किवा सांडपाण्याच्या बादलीत टाकून ठेवा येत जाता तेच पाणी

सांडपाणी म्हणून वापरता येते. पाय धुण्यासाठी वापरता येईल. फरशी पण पुसता येईल की

तरुण मंडळी ची दिल कि धडक्क्क्न म्हणजे बाईक किवा कार १.४ महिन्यात एकदा धुवा आणि आळशी असाल तर जावूद्या

आणखी बचत! वाशिंग सेंटर आहेच की! ओल्या फडक्याने पुसुक काढले तरी Pulsor चमकते किवा स्विफ्ट पण

चमकते.

पाण्याचा प्याला तोंडाला लावला न की TOP TO Bottom Marayacha ९० ml सारखा. जास्तीचे पाणी पिले

तर काहीच नुकसान होत नाही.

पाणी वरून पिले तर धुवायची गरज नाही पडत. प्याला धुण्यासाठी पिलेल्या पाण्याच्या १/४ पाणी लागते.
अति स्वच्छता जपणारे मंडळी असतील तर ते अजून जास्त पाणी वापरतात.

भांडे भिजत घालून ठेवले तर ते लवकर निघतात आणि त्यामुळे पाणी कमीच लागते असेच कपड्यांचे पण

सडा टाकायचा असेल तर आधी तेवढे पाणी गोळा झाले पाहिजे होटेल मालकांनी गिऱ्हाईकाची उरलेलं पाणी जमिनीवर जर

मारले तर जमीन किवा रस्ता किवा फारशी उष्टी नाही होत.

(तसे हि इकडच्या अति चिकट लोकांना पाण्या साठीचा चिटकपण| सुद्धा शिकवावा लागतो म्हणजे .... दुर्दैव). माझी

आज्जी सांगत असायची अरे माठ्या बाथरूम मधेय का ओतलेस ते पाणी झाडांना टाक रे ! !!

रात्री झोपताना सगळे दार बंद आहेत एक ह्याची खात्री करता करता जर सगळे नळ बंद आहेत त्याची खात्री झाली तर उत्तम
काही थेंब वाचतील

नळ आला की जुने पाणी (१ दिवस जुने ) टाकून दिले जाते त्याऐवजी ते दुसऱ्या बाकी गोष्टीन् साठी वापरले जाते.


पाणी वाया गालावाण्यात फ्लश चा फार मोठा हात आहे.
फ्लश ची टाकी साधारण ३ ltr ची असावी.

आमच्या होस्टेल वरच्या नॉन पुणेरी बांधवाना पन चांगली सवय आहे कपडे धुवून उरलेले पाणी संडासाच्या बदलीत टाकून

देतात म्हणजे आपोआप साफ सफाई होवून जाते किवा गाडी वर टाकून देतात नंतर फक्त गाडी वर फडका मारला कि झाले.
मी घरी असताना मी आणि आई हौद धुवूत असायचो ठेवाह हौदातले पाणी आम्ही अंगणात कुंडया, झाडे आणि गाडी वर

टाकायचो.

आई आणि मी कधी कधी पाणी भरायचो तेह्वा एक भांडे भरत असताना दुसरे रिकामे भांडे जवळच असायचे.

पाणी आहे अजून गेले नाही म्हणून आम्ही कधी मोठा पाईप लावून गल्लीभर पाणी मारत नाही बसलो सरळ बंद करून

टाकायचो.
पुढे वडिलांनी अजून एक छोटा हौद बांधून घेतला. गाई म्हशी पाखरे कुत्रे मांजरी त्या पाण्यात तहान भागवतात.



*सार्वजनिक ठिकाणी नळ वाहत असतील तर आपण स्वत:जाऊन ते बंद करावेत. पण पुणेरी कधी पाणउतारा करतील सांगता येत नाही म्हणून this is not a practical thing.

एक रंजक बातमी पाणी ह्या विषयावर येथे दिसेल

माझ्या वडलांनी अजून एक गम्मत केली आहे ! गच्चीवरून येणारे पाणी सरळ एका हौदात सोडले आहे पान त्या पाईप मधेय जाळी लावून घेतली आहे त्यामुळे ते तसे बऱ्यापैकी स्वछच असते.


वरील सगळ्या गोष्टी आपण स्वत करू शकतो त्यामुळे सरकार काय करेल आणि पाण्यचे तानकर वाहताना पाहून त्याला शिकवला जाण्याच्या ऐवजी पहिले हे शिकले तर बरे होईल .

Saturday, May 1, 2010

Maharshtra Din 1st may महाराष्ट्र दिन १ में २०१० महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन


महाराष्ट्र दिन १ में २०१०।
शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती... !

महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन;
आज ५० वर्षे महाराष्ट्र ला अस्तित्वात येवून झालीत;
कामगारांचे लढे कामगारांचे बलिदानावर आजचा महाराष्ट्र उभा आहे; फक्त कामगाराच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात काम करणार्य धुरिनानी हे राज स्वतःया हिमातिवर स्वताच्या बुद्धिने धनाने मोठे केले।




पण परन्तु तर असतोच;
हे राष्ट्र असेच ह्याच मानाने ह्याच अभिमानाने जर सदा सर्वकाल उभे ठेवायचे असेल तर आजच्या पिढीला त्याच काळजी घ्यावी लागेल.
आजही दोन भीषण समस्या भेडसावत आहेत...त्या म्हणजे
१- वीज टंचाई
२- शेतकरी आत्महत्या;
३) पाणी टंचाई। विदर्भ मराठवाडा मधे हो ...
शेती उत्पादनासाठी पाणी नाही, पिण्यासाठी पर्याप्त पाणी नाही...

४) वेगळा विदर्भ

विदर्भातल्या मित्रांना पण शुभेच्छा !
राजकारण्यांची महाराष्ट्र तोडायची भूमिका हाणून पाडा....
महाराष्ट्राला दुहीचा शाप आहे .......त्यात हे राजकारणी आणि माध्यम भर घालतात।


राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनी विदर्भात "एसएमएस'च्या माध्यमातून परस्परविरोधी भावना व्यक्त करणाऱ्या संदेशांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झाली। महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छांना "जय विदर्भ'ने प्रतिसाद दिला जात होता. "एका डोळ्यात अश्रू, दुसऱ्याने हसावे' यासारख्या भावनांना हात घालणाऱ्या संदेशांचा प्रसार दिवसभर होत राहिला.

थोरानी काय स्वप्ने पाहून ठेवली आहे अणि आज काय हा SMS फॉरवर्ड करण्यासाठी ठेवतो

कंबर बांधून ऊठ घाव झेलाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू असताना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी या स्फूर्तिदायक ओळी लिहिल्या;

देवा,राजकारण्यांत इच्छाशक्ति निर्माण होऊ दे व सुंदर संपन्न महाराष्ट्र निर्माण होऊ दे. त्यांच्यातला मराठी माणूस जागा झाला तर भारत देश पण संपन्न होवूशकतो

अणि आमचा मतदार संघ पण जागा होतोय ॥