Saturday, April 23, 2011

पंतप्रधान बोलतात-हत्ती ऐकतात आणि आपण गाढव वाचतो



दैनीक सकाळ ने बऱ्याच दिवसानंतर असा परखड लेख लिहिला आहे ..



तसे आजकाल खरे कुठे वाचायला मिळते


_____________________________________________________
भ्रष्टाचार सहन करण्याची जनतेची सहनशीलता आता संपुष्टात आली आहे, तशीच ती या विषयावरील नेत्यांची भाषणे ऐकूनही आली आहे.

पंतप्रधानांनी या विषयावर केलेले ताजे वक्तव्य म्हणजे त्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचाच प्रकार वाटतो. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी गुरुवारी सनदी सेवा दिनाच्या कार्यक्रमावेळी केलेले भाषण म्हणजे "शब्द बापुडे केवळ वारा' या स्वरूपाचेच आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे देशाच्या विकासात अडथळा येतो, हे नेहमीचेच तुणतुणेही त्यांनी या वेळी वाजविले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला समाजाच्या सर्व स्तरांतून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जनलोकपाल विधेयकाचा मसुदा ठरविण्यासाठी नेमलेली समिती याचेच द्योतक आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत आले, त्या वेळीही पंतप्रधानांनी महागाईपासून ते नक्षलवादाचा नायनाट करण्यापर्यंत अनेक विषयांचा ऊहापोह केला.

पुढे वाचा ........

No comments:

Post a Comment