तब्बल आठवडाभराचं आशिषचं हे ओब्जर्वेशन होते, गीता आपल्याशी नीट बोलत नाहिये. नुकतंच लग्न करून नवीन घरात आल्यामुळे थोडासा वेळ लागेल असे त्यालाही वाटले होते. तसे त्यानी एक दोनदा विचारले देखील, पण गीताने दरवेळेस दुर्लक्ष केले. ती बदलली आहे एवढे मात्र खरे होते.
एके दिवशी, रात्री झोपल्यावर गीता विचार करत पडली होती. आशिष ने ठरवले, आज याचा छडा लावायचाच. तिच्या खूप मागे लागून काय झाले काय झाले विचारले. खूप प्रयत्नानंतर गीताचे उत्तर ऐकून आशिष ला हसू का रडू असे झाले.
ती म्हणाली - "लग्न झाल्यापासून तु बझ वरच्या माझ्या पोस्ट्स लाईक करत नाहिस, कमेंट्स तर अजिबात नाही. तुझं माझ्यावर अजून प्रेम करतोस ना?" :) :) :-D
No comments:
Post a Comment